आज होणार MI vs RR यांच्यात सामना; पराभवाचा बदला घेण्यासाठी मुंबई इंडियन्स उतरणार मैदानात; पलटणची प्लेईंग XI मैदानात

  RR vs MI, Playing XI Prediction : आज आयपीएलमध्ये राजस्थान विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सवाई मानसिंग स्टेडियमवर लढत होणार आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. या सामन्यासाठी कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११? जाणून घ्या.

  हा संघ गुणतालिकेत ७ व्या स्थानी
  आयपीएल २०२४ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना जयपुरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगणार आहे. राजस्थान रॉयल्सचा संघ ७ पैकी ६ सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. तर मुंबई इंडियन्सने ७ पैकी ३ सामने जिंकले असून हा संघ गुणतालिकेत ७ व्या स्थानी आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११? जाणून घ्या.

  लवकरात लवकर बाद करण्याचं आव्हान
  मुंबई इंडियन्स संघाने गेल्या सामन्यात विजय मिळवला आहे. या संघाकडून जसप्रीत बुमराह शानदार गोलंदाजी करतोय. मात्र, इतर कुठल्याही गोलंदाजांकडून त्याला हवी तशी साथ मिळत नाहीये. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्स संघातील फलंदाज संजू सॅमसन, रियान पराग आणि जोस बटलर हे तुफान फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे मुंबईच्या गोलंदाजांसमोर या फलंदाजांना लवकरात लवकर बाद करण्याचं आव्हान असणार आहे.
  घरच्या मैदानावर मुंबईचा पराभव..

  ट्रेन्ट बोल्टची शानदार गोलंदाजी

  आयपीएल २०२४ स्पर्धेत हे दोन्ही संघ आमने-सामने आले आहेत. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात ट्रेन्ट बोल्टने शानदार गोलंदाजी केली होती. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स संघाला २० षटकअखेर १२५ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाने १६ व्या षटकात आव्हान पूर्ण केलं.

  प्लेइंग ११ बदलणार?

  राजस्थान रॉयल्सच्या प्लेइंग ११ मध्ये बदल होण्याची शक्यता खूप कमी आहे.या सामन्यात जर राजस्थान रॉयल्सचा संघ प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला तर जयस्वाल किंवा जोस बटलर हे इम्पॅक्ट प्लेअर असू शकतात. मुंबई इंडियन्स संघाबद्दल बोलायचं झालं तर, सूर्यकुमार यादवचा या सामन्यातही इम्पॅक्ट प्लेअर म्हणून समावेश केला जाऊ शकतो. तर गोलंदाजीला आल्यानंतर आकाश मधवालला संघात स्थान दिलं जाईल.

  या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११…

  मुंबई इंडियन्स : इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या(कर्णधार), तिलक वर्मा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमारियो शेफर्ड, श्रेयस गोपाल,जसप्रीत बुमराह, गेराल्ड कोएत्जी (इम्पॅक्ट प्लेअर – आकाश मधवाल)

  राजस्थान रॉयल्स : जोस बटलर,यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार, यष्टीरक्षक),शिमरोन हेटमायर, रियान पराग, ध्रुव जुरेल, रोमेन पॉवेल, आर अश्विन, ट्रेन्ट बोल्ट, आवेश खान, युजवेंद्र चहल.