MI vs RR: Mumbai-Rajasthan clash, know head to head record, how could be the playing XI?

  नवी दिल्ली : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करणाऱ्या मुंबई इंडियन्सला सोमवारी मुंबईत त्यांच्या घरच्या मैदानावर फॉर्मात असलेल्या राजस्थान रॉयल्सचा सामना करावा लागणार आहे आणि त्यांना पराभवाचा सिलसिला संपवायचा आहे. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सची तर संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सची जबाबदारी सांभाळणार आहे.

  मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार लढत

  राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. यासाठी दोन्ही संघ सज्ज झालेले आहेत. हा सामना संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाईल. राजस्थान रॉयल्सचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत 2 पैकी दोन्ही सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही.

  दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर आतापर्यंत हे संघ २८ वेळा आमनेसामने आले आहेत. येथे मुंबई इंडियन्सचा वरचष्मा राहिला आहे. मुंबईने 28 पैकी 15 सामने जिंकले आहेत. तर राजस्थानने १३ सामने जिंकले आहेत. या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
  दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन अशी असू शकते :
  मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (क), टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना माफाका.
  राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रायन पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान, युझवेंद्र चहल.