पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत नवीन टी-२० लीग

दक्षिण आफ्रिका नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच त्याचे आयोजन करण्याची शक्यता आहे. IPL संघांच्या मालकांनीही या लीगमध्ये स्वारस्य दाखवले आहे. यामुळे ही जगातील मिनी IPL बनू शकते. या मिनी IPLला यशस्वी करण्याची महत्वाची जबाबदारी ग्रॅमी स्मिथकडे देण्यात आली आहे.

    नवी दिल्ली – इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही जगात सर्वाधिक आवडीने पाहिली जाणारी लीग आहे. अनेक क्रिकेटपटूंनी येथे खेळून पैसा आणि प्रसिद्धी मिळवली आहे. याच धर्तीवर पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत नवीन टी-20 लीग सुरू होत आहे.

    दक्षिण आफ्रिका नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच त्याचे आयोजन करण्याची शक्यता आहे. IPL संघांच्या मालकांनीही या लीगमध्ये स्वारस्य दाखवले आहे. यामुळे ही जगातील मिनी IPL बनू शकते. या मिनी IPLला यशस्वी करण्याची महत्वाची जबाबदारी ग्रॅमी स्मिथकडे देण्यात आली आहे.

    या लीगमधील फ्रँचायझींचा लिलाव बुधवार 13 जुलै रोजी बंद झाला मात्र त्याला आता मुदतवाढ देण्यात आली आहे. या लीगमध्ये 6 IPL संघांनी या लीगमध्ये मोठी गुंतवणूक केली असल्याची माहिती मिळते. क्रिडा माहितीनुसार मुंबई इंडियन्सचे मुकेश अंबानी,CSK एन. श्रीनिवासन, DC चे पार्थ जिंदाल, SRH चे मारन कुटुंब, LSG चे संजीव गोयंका आणि RR चे मनोज बदाले यांनी या लीगमध्ये फ्रँचायझी खरेदी करण्यात स्वारस्य दाखवलं आहे.
    क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA)बोर्डाने महिन्याच्या अखेरीस फ्रँचायझीची निवड जाहीर केली जाईल असे कायम ठेवले असले तरी, IPL संघाच्या मालकांना बोलीमध्ये फ्रँचायझी मिळाल्याची माहिती वेबसाइटने दिली आहे.