विश्वचषक ट्रॉफीवर पाऊल ठेवणाऱ्या मिचेल मार्श दिली प्रतिक्रिया, म्हणाला…

मिचेल मार्श चा हा फोटो सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने शेअर केला होता. मागील १० दिवसांपासून सोशल मीडियावर या फोटोची प्रचंड चर्चा होत होती.

    मिचेल मार्श-वर्ल्ड कप २०२३ : वर्ल्ड कप २०२३ चा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पार पडला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताचा ६ गडी राखून पराभव करून अंतिम सामना जिंकून विश्वविजेता झाला. या विजयानंतर सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल झाले. त्यामध्ये ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिचेल मार्शचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये तो वर्ल्ड कप ट्रॉफीवर दोन्ही पाय ठेवून विश्रांती घेत आहे. असे त्या फोटोमध्ये दाखवण्यात आले आहे. या चित्रावर आणि भारतात मिचेल मार्शवर बरीच टीका झाली होती. भारतीय क्रिकेट चाहत्यांनी हा क्रिकेट आणि वर्ल्ड कप ट्रॉफीचा अपमान असल्याचे म्हटले आहे.

    मिचेल मार्श चा हा फोटो सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने शेअर केला होता. मागील १० दिवसांपासून सोशल मीडियावर या फोटोची प्रचंड चर्चा होत होती. त्यामुळे मिचेल मार्शच्या या फोटोमुळे गदारोळ सुरू होता, मात्र आता अखेर मार्शने आपले मौन तोडले आहे. सेन रेडिओला दिलेल्या मुलाखतीत मिचेल मार्शने सांगितले की, ट्रॉफी किंवा भारतीय चाहत्यांचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता.

    जेव्हा मिशेलला विचारण्यात आले की तो पुन्हा विश्वचषक ट्रॉफीवर पाय ठेवणार का? प्रत्युत्तरादाखल मार्श म्हणाला, “प्रामाणिकपणे, कदाचित हो, मी करेन.” तो पुढे म्हणाला, “स्पष्टपणे त्या चित्रात कोणत्याही प्रकारचा अपमान नव्हता. याबाबत मी फारसा विचार केलेला नाही. मी सोशल मीडियावर याबद्दल फारसे पाहिले नाही, जरी बर्याच लोकांनी मला सांगितले की याबद्दलच्या चर्चा संपल्या आहेत. त्यात काहीच नव्हते.”