मोहम्मद शमीकडून सोनू सूदचा मुलगा घेतोय क्रिकेटचे धडे

काही दिवसांपूर्वी अभिनेता सोनू सूदने त्याचा धाकटा मुलगा अयानचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत अयानला मोहम्मद शमी क्रिकेटचे धडे देत असल्याचं दिसतंय.

    मोहम्मद शमी : काल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये महामुकाबला पार पडला. जरी भारताच्या हातामध्ये यंदाचा वर्ल्ड कप आला नाही तरीसुद्धा भारताच्या खेळाडूंनी यंदाच्या वर्ल्ड कप २०२३ मध्ये सुवर्ण कामगिरी केली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये काल वर्ल्डकपचा अंतिम सामना रंगला. भारताला अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला. संपूर्ण वर्ल्डकपमध्ये मोहम्मद शमीने त्याच्या गोलंदाजीने विरुद्ध टीमला जेरीस आणले. मोहम्मद शमीने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतले. अशातच अभिनेता सोनू सूदने त्याचा मुलगा मोहम्मद शमीकडून क्रिकेटचे धडे गिरवत असल्याचं सांगितलंय.

    काही दिवसांपूर्वी अभिनेता सोनू सूदने त्याचा धाकटा मुलगा अयानचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत अयानला मोहम्मद शमी क्रिकेटचे धडे देत असल्याचं दिसतंय. सोनू सूदने हा व्हिडीओ शेअर करत आनंद व्यक्त केलाय. वर्ल्डकपच्या माहोलमध्ये सोनूने हा व्हिडीओ शेअर करत मोहम्मद शमी लेकाला क्रिकेटचे धडे देत असल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय. सोनू सुद्धा या व्हिडीओत दिसतोय. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज शमी मुलाला क्रिकेटचे धडे देत असल्याबद्दल अभिनेत्याने आनंद आणि अभिमान व्यक्त केला आहे.

    दरम्यान सोनू सूदने त्याचा आगामी चित्रपट ‘फतेह’ चं शूटींग पूर्ण केलं आहे. शक्ती सागर प्रॉडक्शनद्वारे, अभिनेत्याने झी स्टुडिओसह “फतेह” ची सह-निर्मिती केली आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना मनोरंजन देईल असे त्याने सांगितले आहे. यापूर्वी कधीही न पाहिलेले ऍक्शन सीक्वेन्स फतेह सिनेमात बघायला मिळतील. फतेह सिनेमा २०२४ ला रिलीज होणार आहे.