टीम इंडियाला मोठा धक्का, मोहम्मद शमीला डॉक्टरांनी दिला ‘हा’ सल्ला; ऑस्ट्रेलियाचे दोन दिग्गज खेळाडू दुसऱ्या सामन्याला मुकणार

टीम इंडियाचा (India) मु्ख्य गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammad Shami) दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरोधातील (Australia) कसोटी मालिकेला मुकावं लागलं आहे. शमीला पहिल्या सामन्यात दुसऱ्या डावातील फलंदाजी दरम्यान उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत (Injured) झाली होती. या दुखापतीमुळे शमीला कसोटी (Test)  मालिकेतून बाहेर व्हावं लागलं.

ऑस्ट्रेलिया संघाचे ओपनर डेविड वॉर्नर आणि पेसर सीन (David Warner and pacer Sean) एबॉट मेनबर्नमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकमार आहेत. चार कसोटी सामन्यांपैकी पहिली कसोटी अॅडलिडमध्ये खेळवण्यात आली होती. आता दुसरा सामना मेलबर्नमध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammed Shami)  ६ आठवडे आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. कारण टीम इंडियाचा (India) मु्ख्य गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammad Shami) दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरोधातील (Australia) कसोटी मालिकेला मुकावं लागलं आहे. शमीला पहिल्या सामन्यात दुसऱ्या डावातील फलंदाजी दरम्यान उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत (Injured) झाली होती. या दुखापतीमुळे शमीला कसोटी (Test)  मालिकेतून बाहेर व्हावं लागलं.

क्रिकेट ऑस्ट्रेलिया संघाने बुधवारी सांगितलं की, वॉर्नर आणि एबॉट दुसऱ्या मालिकेला मुकणार असून त्यांना तिसऱ्या सामन्याला संधी दिली जाणार आहे. या दोन खेळांडूंचे रिप्लेसमेंट दिले गेलेले नाहीयेत. सिडनीमध्ये हे दोन्ही खेळाडू बायो-सिक्योर वातावरणात रिकव्हर होत होते. परंतु त्यांना मेलबर्नमध्ये बोलावण्यात आलं. वॉर्नर क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला होता. त्यामुळे त्याला दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकावे लागणार आहे. आता तिसरा कसोटी सामना ७ जानेवारीला आगामी वर्षात होणार आहे.

शमी इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेला मुकणार?

इंग्लंड टीम इंडियाविरोधात कसोटी, टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. दुखापतीमुळे शमी इंग्लंडविरोधात खेळणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात ५ फेब्रुवारी २०२१ ला पहिली कसोटी खेळण्यात येणार आहे. शमी २२ जानेवारीला ऑस्ट्रेलियातून भारतात परतणार आहे. शमीला भारतात परतल्यानंतर नियमांनुसार काही दिवस क्वारंटाईन रहावं लागणार आहे.