MS Dhoni ने दुबईत हार्दिक पांड्या सोबत केला धम्माल डान्स; व्हिडीओ व्हायरल

आयपीएल सुरू होते तेव्हा रात्री उशिरापर्यंत पार्ट्या होणे ही सामान्य गोष्ट होती, पण त्या पार्ट्यांमध्ये धोनी कधीच दिसला नाही. मात्र, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी दुबईत हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पंड्यासोबत (Krunal Pandya) पार्टी करताना दिसत आहे.

    भारताचा माजी कर्णधार कॅप्टन कुल महेंद्र सिंग धोनी हा अनेकदा क्रिकेटच्या मैदानावर तसेच वैयक्तिक आयुष्यातही काहीसा गंभीर असलेला दिसतो. अनेकदा एखादी मॅच जिंकल्यावर देखील धोनी शांत आणि सय्यमी दिसतो त्यामुळे चाहत्यांमध्ये धोनीची एक वेगळीचं प्रतिमा आहे. मात्र सध्या धोनी चा एका पार्टीतील व्हिडीओ तुफान वायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओत एम एस धोनी धम्माल डान्स करताना दिसत आहे.

    धोनी अनेकदा कोणत्याही पार्टीत जात नाही. तसेच तो कधीही कोणत्याही खेळाडूच्या पार्टीत दिसत नाही. जेव्हा आयपीएल सुरू होते तेव्हा रात्री उशिरापर्यंत पार्ट्या होणे ही सामान्य गोष्ट होती, पण त्या पार्ट्यांमध्ये धोनी कधीच दिसला नाही. मात्र, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी दुबईत हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पंड्यासोबत (Krunal Pandya) पार्टी करताना दिसत आहे. धोनीसोबत त्याची पत्नी साक्षी आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची मुलगी पूर्णा पटेलही होती.