
मुंबई इंडियन्स विरुद्ध दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात CSK ने सहज विजयाची नोंद केली. पण या सामन्याच्या दुसऱ्या डावादरम्यान मुंबईचा फलंदाज सौरव तिवारीने (Tiwari) एक शॉट खेळला, जो धोनी (MS Dhoni) पकडण्यासाठी धावला. त्यानंतर ड्वेन ब्राव्होही (Bravo) तो झेल घेण्याचा प्रयत्न करत धोनीच्या मार्गात आला.
नवी दिल्ली: चेन्नई सुपर किंग्सने (CSK) शाहजाहच्या क्रिकेट स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या 35 व्या (IPL 2021) सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळुरूला (RCB) सहा विकेट्सने दणका दिला आहे. सीएसकेने आयपीएल 2021 च्या दुसऱ्या (Second Session Of IPL) टप्प्यातील पहिल्या सामन्यात गेल्या वर्षीच्या विजेत्या मुंबई इंडियन्सचाही (MI) पराभव केला. पण या सामन्यात एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
मुंबई इंडियन्स विरुद्ध दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात CSK ने सहज विजयाची नोंद केली. पण या सामन्याच्या दुसऱ्या डावादरम्यान मुंबईचा फलंदाज सौरव तिवारीने (Tiwari) एक शॉट खेळला, जो धोनी (MS Dhoni) पकडण्यासाठी धावला. त्यानंतर ड्वेन ब्राव्होही (Bravo) तो झेल घेण्याचा प्रयत्न करत धोनीच्या मार्गात आला. ज्यामुळे तो झेल धोनीच्या हातातून निसटला आणि त्याने रागाने ब्राव्होवर (Dhoni Shouted To Bravo) ओरडले. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (This Incident Viral On Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे.
RCB विरुद्ध खेळण्यात आलेल्या कालच्या सामन्यानंतर धोनीने (MS Dhoni) खुलासा केला की, तो अनेकदा ब्रावोसोबत भांडतो. ‘मी त्याला माझा भाऊ मानतो. दरवर्षी माझ्या आणि ब्रावोमध्ये स्लो बॉल टाकायचा की नाही. यावर लढत होते.
धोनीच्या नेतृत्वाखालील CSK सध्या लीग टेबलमध्ये अव्वल आहे. CSK चे 9 सामन्यांमधील 7 विजयानंतर 14 गुण आहेत आणि हा संघ लवकरच प्लेऑफसाठी पात्र होईल.