MS Dhoni ने केले CSK संघात केले मोठे बदल! काही खेळाडू कायम तर काहींना डिच्चू

    मुंबई : २०२३ मध्ये होणाऱ्या आयपीएल साठी आता सर्वच संघ सज्ज होत आहेत. टीम फ्रँचायझी देखील तयारीला लागले आहेत असून आज संध्याकाळ पर्यंत CSK फ्रेंचाइज़ी १५ खेळाडूंची लिस्ट बीसीसीआयला देणार आहेत. CSK संघ संघाच्या कॅप्टन्सीमध्ये देखील मोठे बदल होण्याची शक्यता असून रवींद्र जाडेजा धोनीची जागा घेणार असल्याचे बोलले जात आहे. महेंद्रसिंग धोनी आणि निवड समिती शेवटच्या क्षणापर्यंत टीममध्ये बदल करण्याची शक्यता आहे.

    सीईओ काशी विश्वनाथन यांचं असं म्हणणं आहे की, चेन्नई सुपर किंग्ज मोठे नाव असलेल्या कोणत्याही खेळाडूला सोडणार नाही. क्रिकबजशी बोलत असताना काशी विश्वनाथ म्हणाले की, आम्ही कोणत्याही मोठ्या खेळाडूला सोडणार नाही. आम्हाला जसं समजलं की, जाडेजा टीममध्ये खेळण्यासाठी फिट आहे, त्याला आम्ही तात्काळ कायम करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या मोसमात त्याच्या आणि फ्रँचायझीमध्ये काही मतभेद झाले होते. पण यावर्षी तो पुन्हा चेन्नई सुपर किंग्जकडून मैदानात खेळताना दिसणार आहे.

    मागच्यावर्षी रविंद्र जाडेजाकडे कर्णधारपद देण्यात आलं होतं. जाडेजाच्या कर्णधारपदाच्या काळात टीमने १४ मॅचपैकी फक्त ४ मॅच जिंकल्या. आता पुन्हा जाडेजाला चेन्नई सुपर किंग्स कर्णधार पदं देण्यात येणार आहे. यावेळी तो किती यशस्वी होतोय हे पाहावं लागणार आहे. क्रिस जॉर्डन, चोटिल एडम मिल्ने, रॉबिन उथप्पा, नारायण जगदीशन,मिचेल सेंटनर या खेळाडूंना चेन्नई सुपर किंग्ज कायम करण्याची शक्यता आहे.