मुंबई इंडियन्सचा IPL मधून पत्ता कट! हे संघ जाणार प्लेऑफमध्ये…

आता सनरायझर्स संघ 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. याचाच अर्थ मुंबई इंडियन्सला आता या तिन्ही संघांवर मात करता येणार नाही.

    प्लेऑफची शर्यत : पाच वेळा इंडियन प्रीमियर लीगची चॅम्पियन मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाली आहे. काल लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना पाहायला मिळाला. कालचा सामना सनरायझर्स हैदराबादच्या संघाने १० विकेट्सने लखनौ सुपर जायंट्सवर विजय मिळवून आपले स्थान प्लेऑफच्या शर्यतीत जवळ आणले आहे. लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध सनरायझर्सच्या विजयासह मुंबईचे नाव गुणतालिकेत आणखीनच संपुष्टात आले आहे. कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सचे संघ प्रत्येकी 16 गुणांसह IPL 2024 च्या गुणतालिकेत अव्वल स्थानांवर आहेत.

    आता सनरायझर्स संघ 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. याचाच अर्थ मुंबई इंडियन्सला आता या तिन्ही संघांवर मात करता येणार नाही. गुणतालिकेची स्थिती पाहता मुंबई इंडियन्स सध्या नवव्या स्थानावर आहे. मुंबईचे आतापर्यत १२ सामने झाले आहेत. त्यापैकी त्यांना फक्त ४ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. तर ८ सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.

    साखळी फेरीत मुंबईचे फक्त दोन सामने बाकी आहेत. अशा स्थितीत मुंबईने आपले दोन्ही सामने जिंकले तरी केवळ १२ गुणच मिळवता येतील. अशा स्थितीत इतर संघांच्या गुणांचे समीकरण असे बनते की मुंबई कोणत्याही परिस्थितीत अंतिम चारमध्ये पोहोचू शकणार नाही. पॉइंट टेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपरजायंट्स आघाडीवर आहेत. आयपीएलचा 64वा सामना या दोघांमध्ये रंगणार आहे. दोन्ही संघांचे अजून दोन सामने बाकी आहेत. दोघांचे गुणतालिकेत १२-१२ गुण आहेत. याचा अर्थ या दोघांपैकी जो हा सामना जिंकेल त्याला 14 गुण मिळतील. त्यामुळे मुंबईला अंतिम चारमध्ये स्थान मिळवणे अशक्य होईल.