T20 विश्वचषकासाठी मुंबई इंडियन्सचा दबदबा! या संघांमधून एकही भारतीय खेळाडूची नाही झाली निवड

मुंबई इंडियन्समधून रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. राजस्थान रॉयल्सच्या संघातील यशस्वी जैस्वाल, युझवेंद्र चहल आणि संजू सॅमसन यांना स्थान मिळाले आहे.

    T20 विश्वचषक : T20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. भारताच्या T20 विश्वचषकाच्या संघाचे नेतृत्व रोहित शर्मा (Rohit Sharma) करणार आहे. तर भारताचा संघाचे उपकर्णधारपद हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) भूषवण्यात आले आहे. आयपीएल (IPL 2024) संघाबद्दल बोलायचे झाले तर मुंबई इंडियन्सच्या संघातील ४ खेळाडूंना टी-20 वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळाले आहे. मुंबई इंडियन्समधून रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. राजस्थान रॉयल्सच्या संघातील यशस्वी जैस्वाल, युझवेंद्र चहल आणि संजू सॅमसन यांना स्थान मिळाले आहे.

    पण याशिवाय, आयपीएलचे 4 संघ असे देखील आहेत ज्यांच्या टी-20 विश्वचषकासाठी एकही भारतीय खेळाडूंची निवड झाली नाही. सनरायझर्स हैदराबाद व्यतिरिक्त, गुजरात टायटन्स, लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या एकाही खेळाडूला T20 विश्वचषकासाठी टीम इंडियाचा भाग बनवण्यात आले नाही. तथापि, सनरायझर्स हैदराबादचे अभिषेक शर्मा आणि टी नटराजन हे टी-20 विश्वचषक संघात निवडीचे दावेदार होते. तर गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलचा दावा मजबूत होता. त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्सच्या रिंकू सिंबला प्रबळ दावेदार मानले जात होते, मात्र या खेळाडूंनी निराशा केली.

    दिल्ली कॅपिटल्सच्या संघातून तीन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यामध्ये रिषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल या खेळाडूंचा समावेश आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्जचे प्रत्येकी 2 खेळाडू टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चांगल्या फॉर्ममध्ये असणारा विराट कोहली आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे तर चेन्नई सुपर किंग्सचे रवींद्र जडेजा आणि शिवम दुबेवर विश्वास दाखवला आहे. पंजाब किंग्जच्या अर्शदीप सिंगला T20 विश्वचषक संघात स्थान मिळाले आहे. 2 जूनपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे.