मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा महामुकाबला, जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल

राजस्थान रॉयल्स 7 सामन्यांत 6 जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. मुंबईविरुद्धचा सामना जिंकून राजस्थानला गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखायचे आहे.

  मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स : आज आयपीएल 2024 (IPL 2023) चा 38 वा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात रंगणार आहे. आजचा हा सामना राजस्थानच्या होमग्राउंडवर जयपूरमध्ये होणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्ससाठी महत्वाचा आहे. सध्या हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुमबी इंडियन्सचा संघ आयपीएल २०२४ च्या या क्रमवारीत सातव्या स्थानावर आहे. अशा स्थितीत राजस्थानविरुद्ध विजय मिळवून संघाला आपली स्थिती सुधारायची आहे. राजस्थान रॉयल्स 7 सामन्यांत 6 जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. मुंबईविरुद्धचा सामना जिंकून राजस्थानला गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखायचे आहे.

  जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल
  जयपूरचे सवाई मानसिंग स्टेडियम हे फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीसाठी ओळखले जाते. आतापर्यंत येथे खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये सर्वात मोठी धावसंख्या १९६ धावांची आहे. येथे दोन्ही डावात मोठी धावसंख्या पाहायला मिळते. मात्र, येथे दवाचा फारसा परिणाम होत नाही. अशा स्थितीत दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला फारसा फायदा मिळत नाही. फिरकीपटूंना मदत विकेटमध्ये दिसून आली आहे. जसजसा सामना पुढे जाईल तसतसे फिरकीपटू अधिक प्रभावी होतात.

  आज दोन्ही संघांना आपल्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनसह सामन्यात उतरायचे आहे. चला तर मग जाणून घेऊया या सामन्यासाठी दोन्ही संघांचे प्लेईंग इलेव्हन काय असतील.

  मुंबई इंडियन्सचे संभाव्य प्लेइंग ११

  रोहित शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह.
  इम्पॅक्ट प्लेयर- आकाश मधवाल.

  राजस्थान रॉयल्सचे संभाव्य प्लेइंग ११
  यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रायन पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन/संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.
  इम्पॅक्ट प्लेयर- नांद्रे बर्जर/केशव महाराज.