‘ माझ्या मुलानं माझं पदकाचं स्वप्न पूर्ण केलं…..’ बजरंग पूनियाच्या वडिलांनी व्यक्त केला आनंद

पुनियाला मिळालेल्या यशाबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना वडील बलवान सिंह यांनी आनंद व्यक्त करू शकत नाही इतका आनंद झाला आहे. माझ्या मुलाने पदकाचे माझे स्वप्न पूर्ण केले अशी भावना व्यक्त केली.

    टोकियो ऑलिम्पिक(Tokyo Olympic)मध्ये ६५ किलो वजनी गटात कुस्तीपटू बजरंग पुनियाने कांस्यपदकाची(Bajrang Punia Wins Bronze Medal) कमाई केली आहे.कझाकिस्तानच्या नियाझबेकोवरच्या या लढतीत पुनियाने सुरुवातीपासून आघाडी घेत हा विजय मिळवला आहे. इतिहास रचत पुनियाने ही लढाई जिंकली आहे.

    माझ्या मुलानं माझं पदकाचं स्वप्न पूर्ण केलं

    पुनियाला मिळालेल्या यशाबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना वडील बलवान सिंह यांनी आनंद व्यक्त करू शकत नाही इतका आनंद झाला आहे. माझ्या मुलाने पदकाचे माझे स्वप्न पूर्ण केले अशी भावना व्यक्त केली.

    पुनियाच्या यशानंतर कुटुंबीयांचा आनंद

    कझाकिस्तानच्या नियाझबेकोवर सोबतच्या लढाईत पुनियाने सुरुवातीलाच आघाडी घेत त्याने एक एक डाव टाकत २ पॉईंट घेतले. दोन पॉईंटची आघाडी असताना, त्याने आणखी एक डाव टाकून २ पॉईंट घेतले. मग त्याने आक्रमक पवित्रा घेत आणखी २ पॉईंट घेऊन, आपली आघाडी ६-० अशी केली. अखेर बजरंग पुनियानं मॅच ८-० अशी जिंकत भारताला कांस्य पदक मिळवून दिलं.