
टोकियो ऑलिम्पिक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. भारताला पदक मिळवून देण्याची सर्वांत जास्त आशा असणाऱ्या बॉक्सिंग चॅम्पियन एमसी मेरी कोमने देखील तयारीला सुरुवात केली आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेता मेरी कोम सध्यातरी पुण्याच्या सेना खेल संस्थानात सराव करत आहे. मागील वर्षी कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेली टोक्यो ऑलिम्पिक यंदा पार पडणार असल्याने मेरीने या स्पर्धेसाठी संपूर्ण तयारी केली असून लवकरच ती सरावासाठी इटलीला रवाना होणार आहे.
पुणे : टोकियो ऑलिम्पिक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. भारताला पदक मिळवून देण्याची सर्वांत जास्त आशा असणाऱ्या बॉक्सिंग चॅम्पियन एमसी मेरी कोमने देखील तयारीला सुरुवात केली आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेता मेरी कोम सध्यातरी पुण्याच्या सेना खेल संस्थानात सराव करत आहे. मागील वर्षी कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेली टोक्यो ऑलिम्पिक यंदा पार पडणार असल्याने मेरीने या स्पर्धेसाठी संपूर्ण तयारी केली असून लवकरच ती सरावासाठी इटलीला रवाना होणार आहे.
मेरी कोमने सांगितले की, मी ऑलिम्पिकला रवाना होण्याच्या कार्यक्रमात काहीसा बदल केला आहे. मी भारतातून थेट टोकियोला जाणार नसून आधी इटलीला रवाना होणार आहे. तेथे सराव केल्यानंतर ऑलिम्पिकसाठी रवाना होईल. भारतातून गेल्यानंतर क्वारंटाईन राहावे लागते ज्यामुळे सरावाची लय तुटेल आणि तोटा होईल या कारणाने मी आधी इटलीला सराव करणार आहे. मेरी कोमसोबत तिचे खाजगी प्रशिक्षक छोटे लाल यादव आणि फिजियो देखील असणार आहेत.