वर्ल्डकप फायनल पाहण्यासाठी स्टेडियमवर नेते अभिनेते राहणार उपस्थित!

गृहमंत्री अमित शाहदेखील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पाहायला येणार आहेत.

  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषक २०२३ चा (World Cup 2023 Final) अंतिम सामना आज खेळला जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) दुपारी 2 वाजता दोन्ही संघांमधील विजेतेपदाची लढत सुरू होईल. संपूर्ण जगाचं लक्ष लागून असलेला हा क्रिकेटचा महासंग्राम बघण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे. अहमदाबादमधी नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना पाहण्यासाठी जगभरातुन क्रिकेटप्रेमी भारतात आले आहेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप मेगाफायनल पाहण्यासाठी नेते अभिनेते, खेळाडू हजेरी लावणार आहे.

  कोण कोण राहणार उपस्थित

  एकीकडे मैदानात भारत ऑस्ट्रेलिया (World Cup 2023 Final) यांच्यात कडवी झुंज रंगत असताना स्टेडियमवर दिग्गज सामना पाहण्यासाठी उपस्थित असतील. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहदेखील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पाहायला येणार आहेत. यासोबतच कपिल देव, सचिन तेंडुलकर, टीम इंडियाचे माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीदेखील हजेरी लावणार आहे. याचबरोबर अभिनेते रजनीकांत,अमिताभ बच्चन,  शाहरुख खान, आमिर खान आणि रणवीर सिंह, अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफदेखील सामना पाहायला उपस्थित असतील.

  आज होणार महाअंतिम मुकाबला

  ५ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत ४६व्या दिवशी विजेतेपदाचा निर्णय होणार आहे. भारताच्या नजरा तिसर्‍या ट्रॉफीवर असतील आणि संघाला त्याचा दीर्घकाळ चाललेला विजेतेपदाचा दुष्काळ संपवायचा आहे. विश्वचषकाच्या इतिहासात दुसऱ्यांदा भारत आणि ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत आमनेसामने येत आहेत. टीम इंडिया 2003 मधील वर्ल्ड कप फायनलमधील पराभवाचा बदला घेण्याच्या प्रयत्नात असेल. हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी क्रिकेटप्रेमी प्रार्थना करत आहेत. भारताने 12 वर्षांपूर्वी शेवटचा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारत 2011 मध्ये चॅम्पियन बनला होता. तर, कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी 1983 मध्ये ट्रॉफीवर कब्जा केला.