nasa major cricket league

मेजर लीग क्रिकेटचे संचालक जस्टिन गेली म्हणाले, “मेजर लीग क्रिकेटच्या पहिल्या सत्रात, जगभरातील अनेक सर्वोत्तम T20 खेळाडू अमेरिकेतील प्रतिभावान खेळाडूंसोबत खेळताना दिसतील. ह्यूस्टनमधील स्पेस सेंटरमध्ये १९ मार्च रोजी ड्राफ्ट इवेंटनंतर संघ पुढे जाताना पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

    अमेरिकेचे मेजर लीग क्रिकेट (MLC) 19 मार्च रोजी ह्यूस्टनमधील नासा स्पेस सेंटरमध्ये लॉन्च होईल. जुलैमध्ये खेळल्या जाणार्‍या फ्रँचायझी-आधारित टी-20 स्पर्धेत सहा संघांचा समावेश आहे. ज्यामध्ये न्यूयॉर्क, वॉशिंग्टन डीसी, डॅलस, सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजेलिस आणि सिएटलमधील प्रत्येकी एक संघ सहभागी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या स्पर्धेचा पहिला हंगाम 18 दिवसांचा असेल आणि डॅलस आणि मॉरिसविले येथील एमएलसी मैदानावर खेळवला जाईल.

    क्रिकबझच्या अहवालानुसार, मेजर लीग क्रिकेटच्या पहिल्या सत्रात प्रत्येक संघ पाच लीग सामने खेळेल. संघाची टीम पर्स सुमारे US$750,000 (६ कोटींहून अधिक) असेल. हे दक्षिण आफ्रिकन लीग एसए-टी-20 आणि यूएच्या आयएल टी-20 च्या प्रति सामन्याच्या सरासरी पगाराच्या जवळपास आहे.

    आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) एफटीपीमध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, पाकिस्तान आणि न्यूझीलंडसाठी मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने नाहीत. अशा वेळी ही स्पर्धा होणार आहे. अशा परिस्थितीत जगातील अनेक क्रिकेट स्टार या लीगमध्ये खेळताना दिसू शकतात.

    मेजर लीग क्रिकेटचे संचालक जस्टिन गेली म्हणाले, “मेजर लीग क्रिकेटच्या पहिल्या सत्रात, जगभरातील अनेक सर्वोत्तम T20 खेळाडू अमेरिकेतील प्रतिभावान खेळाडूंसोबत खेळताना दिसतील. ह्यूस्टनमधील स्पेस सेंटरमध्ये १९ मार्च रोजी ड्राफ्ट इवेंटनंतर संघ पुढे जाताना पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

    मेजर लीग क्रिकेटने कोणत्याही संघाच्या संघात सात परदेशी खेळाडूंना परवानगी दिली आहे. कोरी अँडरसन, सामी अस्लम, उन्मुक्त चंद यांसारख्या खेळाडूंचा समावेश असणार आहे. तसेच इतर देशांतून आलेल्या आणि अमेरिकेत खेळणाऱ्या खेळाडूंना स्थानिक क्रिकेटपटू म्हणून ड्राफ्टमध्ये स्थान दिले जाईल.