#Tokyo Olympics 2020 : नीरज चोप्राकडून सुवर्ण पदक फ्लाईंग सिख ‘मिल्खा सिंह’ यांना समर्पित ; म्हणाला…

भालाफेकपटू नीरज चोप्राने लांब भाला फेकत सुवर्ण कामगिरी केली आहे. नीरजने अंतिम फेरीत आपलं वर्चस्व कायम ठेवत पहिल्याच थ्रोमध्ये ८६.०३ मीटर इतका दूर भाला फेकला. त्यानंतर दुसऱ्या थ्रोमध्ये नीरजने ८७.५८ मीटर इतका दूर भाला फेकत इतिहास रचला आहे.

  टोक्यो ऑलिम्पिकसाठी आजचा दिवस इतिहास ठरला आहे. तसेच आजच्या दिवसाची सुवर्ण अक्षरात नोंद करण्यात आली आहे. भालाफेकपटू नीरज चोप्राने लांब भाला फेकत सुवर्ण कामगिरी केली आहे. नीरजने अंतिम फेरीत आपलं वर्चस्व कायम ठेवत पहिल्याच थ्रोमध्ये ८६.०३ मीटर इतका दूर भाला फेकला. त्यानंतर दुसऱ्या थ्रोमध्ये नीरजने ८७.५८ मीटर इतका दूर भाला फेकत इतिहास रचला आहे.

  नीरजने हे सुवर्ण पदक ‘फ्लाईंग सिख’ म्हणून ओळखले जाणारे दिवगंत धावपटू मिल्खा सिंह यांना समर्पित केलं आहे. मिल्खा सिंह यांचे नुकतेच काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं.

  विजयानंतर नीरजने दिली अशी प्रतिक्रिया…

  नीरजने सांगितलं की, मी माझे हे सुवर्ण पदक महान मिल्खा सिंग यांना समर्पित करतो. मी कधीच सुवर्णपदक जिंकण्याचा विचार केला नव्हता, पण काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. मला ऑलिम्पिक स्पर्धेचा विक्रम मोडायचा होता,असं नीरज याने सांगितले.

  मिल्खा सिंह यांनाच नीरजने पदक समर्पित केलं, काय आहे कारण?

  नीरजने फ्लाईंग सिख मिल्खा सिंह यांना पदक समर्पित केल्यानंतर अनेकांकडून सवाल उपस्थित होऊ लागले. परंतु मिल्खा सिंह यांनी एका कार्यक्रमात सुवर्ण पदाकाविषयी एक इच्छा व्यक्त केली होती. ऑलिम्पिक स्पर्धेत युवा खेळाडूला अ‍ॅथेलेटिक्समध्ये सुवर्ण पदक जिंकताना पाहायचंय, असं मिल्खा सिंह यांचं स्वप्न होतं. ते स्वप्न आज सत्यात उतरत पूर्ण झालं आहे. परंतु दुर्दैवाने मिल्खा सिंह यांच्या हयातीत ते स्वप्न पूर्ण झालं नाही. मात्र, ते स्वप्न आज नीरजने पूर्ण केलं आहे. या कारणामुळे नीरजने मिल्खा सिंह यांना हे सुवर्णपदक समर्पित केलं आहे.