#Tokyo Olympics 2020 : २४ तासांतच नीरजच्या चाहत्यांमध्ये लाखोंची वाढ, ऐतिहासिक कामगिरीनंतर सोशल मीडियावर धुमाकूळ

नीरजच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर अवघ्या तासांतच म्हणजेच २४ तासांतच नीरजच्या चाहत्यांमध्ये आणखीन लाखो चाहत्यांची वाढ झाली आहे. तसेच चाहते सुद्धा सोशल मीडियावर धूमाकुळ घातल आहेत. नीरजचं इन्स्टाग्राम प्रोफाईल पाहिला असता जवळपास १ लाख इतके चाहते (followers ) होते. परंतु आता नीरजच्या चाहत्यांच्या संख्येत २.२ लाखांहून अधिक चाहत्यांची वाढ झाली आहे. 

    टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण कामगिरी केल्यानंतर भारतात जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आहे. तब्बल १२१ वर्षांच्या इतिहासात ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवणारा नीरज चोप्रा पहिला खेळाडू ठरला आहे. २३ वर्षीय नीरजने कास्यं आणि सिल्व्हर पदकाकडे न पाहता भाल्याला उंच लांबवत भारताला सुवर्ण पदकाकडे नेऊन ठेवलं. त्यानंतर नीरजवर संपूर्ण भारतीयांकडून आनंदाचा वर्षाव करण्यात आला. दुसऱ्या थ्रोमध्ये नीरजने ८७.५८ मीटर इतका दूर भाला फेकत इतिहास रचला आहे.

    नीरजच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर अवघ्या तासांतच म्हणजेच २४ तासांतच नीरजच्या चाहत्यांमध्ये आणखीन लाखो चाहत्यांची वाढ झाली आहे. तसेच चाहते सुद्धा सोशल मीडियावर धूमाकुळ घातल आहेत. नीरजचं इन्स्टाग्राम प्रोफाईल पाहिला असता जवळपास १ लाख इतके चाहते (followers ) होते. परंतु आता नीरजच्या चाहत्यांच्या संख्येत २.२ लाखांहून अधिक चाहत्यांची वाढ झाली आहे.

    हरियाणातील गोल्डन बॉयवर पुरस्कारांचा वर्षाव होत आहे. तसेच हरियाणा सरकारकडून नीरजला ६ कोटी रूपयांचं रोख बक्षीस देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे क्लास वन अधिकारी आणि स्वस्त दरात जमीन देण्यात येणार आहे.

    नीरजच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर अनेकांनी उघडलं बक्षीसाचं खातं

    पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी निरजच्या यशाचे कौतुक करत २ कोटींचे रोख बक्षीस जाहीर केले. यावेळी मुख्यमंत्री सिंग म्हणाले, संपूर्ण देशवासिय आणि पंजाबसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. तसेच लष्करात सेवा करणाऱ्या नीरजचे कुटुंब मुळ हरियाणातले आहे. तसेच केंद्र सरकारकडून ७५ लाख, पंजाब सरकारकडून २ कोटी आणि बीसीसीआय सोबतच चेन्नई सुपर किंग्सकडून १ कोटींचं बक्षीस देत त्याचा सन्मान करण्यात येणार आहे.