
अंतिम सामना २७ ऑगस्ट रोजी होणार आहे. नीरज चोप्राची चालू हंगामामधील ही सर्वात्तम कामगिरी आहे.
नीरज चोप्रा : भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने (Neeraj chopra) दमदार कामगिरी करत जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये (World Athletics Championships) शानदार खेळ दाखवला आहे. नुकताच पार पडलेला पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये स्थान निश्चित केले आहे. नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८८.७७ मीटर भालाफेक करून अंतिम फेरीत स्थान मिळवले. अंतिम सामना २७ ऑगस्ट रोजी होणार आहे. नीरज चोप्राची चालू हंगामामधील ही सर्वात्तम कामगिरी आहे. याआधी त्याची चालू हंगामामधील कामगिरी ८८.६७ अशी होती. यासोबतच नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी पात्र ठरला आहे. पॅरिस ऑलिम्पिक २६ जुलै ते ११ ऑगस्ट यादरम्यान खेळवले जाणार आहे.
सुरु असलेल्या या चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोप्रासह जगभरामधील ३६ भालाफेकपटूंनी भाग घेतला आहे. नीरज चोप्राला गट-अ मध्ये स्थान देण्यात आले आहे. यामध्ये गतविजेते अँडरसन पीटर्स आणि ज्युलियन पीटर्स यांचाही समावेश आहे. पाकिस्तानच्या अर्शद नदीम आणि जेकब वडलेच या स्टार खेळाडूंना ब गटात ठेवण्यात आले आहे. भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये स्थान मिळवण्यासाठी पात्रता गुण ८३ मीटर आहे जे भारताच्या नीरज चोप्रासाठी खूप सोपे आहे. भारताचा नीरज चोप्रा हा अमेरिका येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने रजत पदक पटकावले होते.
वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी, नीरज चोप्राने या हंगामात केवळ दोन उच्च-स्तरीय स्पर्धा खेळल्या होत्या. यामध्ये दोहा आणि लॉसने डायमंड लीग दोन्हीमध्ये प्रथम स्थान मिळवले आहे. या दोन स्पर्धांदरम्यान त्याने दुखापतीमुळे महिनाभर विश्रांतीही घेतली होती. सुमारे दोन महिन्यांच्या विश्रांती आणि प्रशिक्षणानंतर चोप्रा म्हणाला की, तो मोठ्या स्पर्धेसाठी तयार आहे, ज्याचा दर्जा ऑलिम्पिकसारखाच आहे. सुवर्णपदकाच्या इतर दावेदारांमध्ये झेक प्रजासत्ताकचा जेकब वडलेच, जर्मनीचा ज्युलियन वेबर आणि गतविजेता अँडरसन पीटर्स यांचा समावेश आहे.या चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोप्राने पदक पटकावले तर निशाणेबाज अभिनव बिंद्रा नंतर ओलंपिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप या दोन्ही स्पर्धा जिंकणारा दुसरा भारतीय बनेल.