अटीतटीच्या सामन्यात नेदरलँडची सेनेगलवर मात

    कतार येथे सुरु असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत दुसऱ्या दिवशी नेदरलँड विरुद्ध सेनेगल यांच्यात फुटबॉलचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात नेदरलँड संघाने सेनेगलवर २-० असा विजय मिळवून स[स्पर्धेतील पहिला सामना खिशात घातला. अतिशय रोमांचक सामन्यात पहिली ८५ मिनिटं दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. मात्र त्यानंतर नेदरलँड संघाने तीन गोल करून आघाडी घेतली. सेनेगलच्या संघाने देखील यासामन्यात अतिशय झुंज दिली मात्र त्यांना कडवी झुंज दिली सेनेगलविरोधात दोन गोल करून नेदरलँडने विजय मिळवला.

    सेनेगलचा संघ सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक दिसत होता. सामन्याच्या पहिल्याच मिनिटात गोल डागण्याचा सेनेगलचा प्रयत्न हुकला. पण त्यानंतर मिळालेल्या कॉर्नर किकवरही सेनेगल काही करू शकला नाही. पहिल्या १५ मिनिटांमध्ये सामन्यात सेनेगलचं वर्चस्व दिसलं. या वेळेत सेनेगलनं फ्री किक्सही मिळवल्या, पण त्यांचा फारसा उपयोग झाला नाही. त्यानंतर नेदरलँड्सनं दोन प्रयत्न केले, पण दोन्ही प्रयत्न अपयशी ठरले. सामन्याच्या २७ व्या मिनिटाला व्हर्जिल व्हॅन डायकच्या हेडरनं नेदरलँड्स गोलच्या जवळ पोहोचला, पण हा प्रयत्नही हुकला.

    सेकेंड हाफमध्ये सुमारे ४० मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांनी गोल करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आलं नाही. नेदरलँड्सच्या विजयाचं श्रेय काही प्रमाणात त्यांच्या गोलरक्षकाला जाते. सेनेगलचा प्रयत्न धुळीस मिळवण्यात त्यानं महत्त्वाची भूमिका बजावली. नेदरलँडच्या गोलरक्षकानं दोन उत्कृष्ट सेव्ह केले नाहीतर सेनेगलला सामन्यात सहज आघाडी मिळाली असती. नेदरलँड्सनं अखेर ८५ व्या मिनिटाला डाव साधत सामन्यात आघाडी घेतली. सामन्याची वेळ संपल्यानंतर आठ मिनिटांचा अतिरिक्त वेळ जोडण्यात आला. ज्यामध्ये सेनेगलकडे स्कोअर बरोबरीत आणण्याची संधी होती. सेनेगल संघाने प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला.