
भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत हार्दिक पांड्याला टी-20 संघाचा कर्णधार बनवला आहे. हार्दिकने यापूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताचे नेतृत्व केले आहे. या मालिकेत टीम इंडियाने किवी संघाचा 1-0 असा पराभव केला.
मुंबई : भारतीय संघाला येणाऱ्या नवीन वर्षात नवा कर्णधार लाभणार आहे. विराट कोहली, रोहीत शर्मा यांसारख्या प्रतिभावान क्रिकेटपटूनंतर भारतीय संघाच्या स्टार अष्टपैलु खेळाडूंपैकी एक असणाऱ्या हार्दिक पांड्याच्या खांद्यावर संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 2023 वर्षाची सुरुवात भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील मालिकेतने होणार असून ही मालिक भारतात खेळवला जाणार आहे. श्रीलंके विरुद्ध भारत मालिकेची सुरुवात 3 जानेवारीला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार्या पहिल्या टी-20 सामन्याने होणार आहे.
भारताला श्रीलंकेविरुद्ध अवघ्या 13 दिवसांत एकूण 6 सामने खेळायचे आहेत. दुसरा टी-20 सामना 5 जानेवारीला पुण्यात तर मालिकेतील शेवटचा सामना 7 जानेवारीला राजकोटमध्ये खेळला जाणार आहे. एकदिवसीय मालिकेबद्दल बोलायचे झाला तर पहिला एकदिवसीय सामना 10 जानेवारीला गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे, तर पुढील दोन सामने कोलकाता आणि तिरुअनंतपुरम येथे 12 आणि 15 जानेवारीला होतील. या मालिकेसाठी भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांच्या वनडे आणि टी-20 संघांची घोषणा करण्यात आली आहे.
भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत हार्दिक पांड्याला टी-20 संघाचा कर्णधार बनवला आहे. हार्दिकने यापूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताचे नेतृत्व केले आहे. या मालिकेत टीम इंडियाने किवी संघाचा 1-0 असा पराभव केला. टी-20 वर्ल्ड कपपासूनच हार्दिक पांड्याला टीम इंडियाचा नवा टी-20 कर्णधार बनवण्याची चर्चा आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका 2023 पूर्ण वेळापत्रक
पहिला टी-20 सामना – 3 जानेवारी 2023 (मंगळवार) – मुंबई – संध्याकाळी 7
दुसरा टी-20 सामना – 5 जानेवारी 2023 (गुरुवार) – पुणे – संध्याकाळी 7
तिसरा टी-20 सामना – 7 जानेवारी 2023 (शनिवार) – राजकोट – संध्याकाळी 7 वाजता
पहिला एकदिवसीय सामना – 10 जानेवारी 2023 (मंगळवार) – गुवाहाटी – दुपारी 2 वा.
दुसरा एकदिवसीय सामना – 12 जानेवारी 2023 (गुरुवार) – कोलकाता – दुपारी २
तिसरा एकदिवसीय सामना – 15 जानेवारी 2023 (रविवार) – तिरुवनंतपुरम – दुपारी 2 वा
भारतीय टी-20 संघ : हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन (यष्टिरक्षक), ॠतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हूडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.
भारतीय एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.