आज न्यूझीलंड-बांग्लादेश यांच्यात लढत; आकडेवारी काय सांगते? सामना कुठे व कसा पाहता येणार?

यापूर्वी झालेल्या न्यूझीलंडनं दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे, तर बांग्लादेशने एका सामन्यात विजय मिळवलाय, तर एका सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळं आजच्या सामन्यात कोण विजयी होतो, याकडे क्रिकेटप्रेमीचे लक्ष लागले आहे.

    चैन्नई – सध्या भारतात सर्वंत्र क्रिकेटमय वातावरण झालं आहे. आयसीसी वनडे वर्ल्ड कप (Cricket World Cup 2023) स्पर्धेचा ज्वर आता चांगलाच चढला आहे. काल झालेल्या सामन्यात पाच वेळा विश्वविजेता ठरलेल्या कांगारुंना दक्षिण आफ्रिकेनं धूळ चारली. यानंतर आज विश्वचषकातील 11 वा सामना न्यूझीलंड विरुद्ध बांग्लादेश (New Zealand-Bangladesh) यांच्यात खेळविण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन M.A. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलंय. हा सामना डे-नाईट असून, सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. यापूर्वी झालेल्या न्यूझीलंडनं दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे, तर बांग्लादेशने एका सामन्यात विजय मिळवलाय, तर एका सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळं आजच्या सामन्यात कोण विजयी होतो, याकडे क्रिकेटप्रेमीचे लक्ष लागले आहे. (New Zealand-Bangladesh match today; What do the statistics say? Where and how to watch the match)

    आत्तापर्यंत प्रत्येक संघाचे दोन सामने…

    दरम्यान, क्रिकेट विश्वचषकाला पाच ऑक्टोबर रोजी सुरुवात झाली आहे, तर अद्यापपर्यंत प्रत्येकी संघाचे दोन-दोन सामने झाले आहेत. त्यामुळं गुणतालिकेत मोठा फरक दिसत आहे. कालपर्यंत न्यूझीलंडनं दोन्ही सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले होते, मात्र काल झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं कांगारुंना मोठ्या फरकाने हरवत अव्वल स्थानी विराजमान झाले आहेत. तर न्यूझीलंड दुसऱ्या स्थानी तर भारत आणि पाकिस्तान तिसऱ्या व चौथ्या स्थानी आहेत.

    हेड टू हेड…

    एकदिवसीय सामन्यात अजूनपर्यंत न्यूझीलंड विरुद्ध बांग्लादेश यांच्यात 41 सामने झाले आहेत, यात न्यूझीलंड 30 वेळा विजयी झाली आहे, तर बांग्लादेशने न्यूझीलंडला 10 वेळा हरवले आहे. एका सामन्याचा निकाल लागला नाही.

    गुणतालिका काय सांगते?

    संघ सामने विजय पराभव गुण रनरेट
    दक्षिण आफ्रिका 2 2 0 4 +2.360
    न्यूझीलंड 2 2 0 4 +1.958
    भारत 2 2 0 4 +1.500
    पाकिस्तान 2 2 0 4 +0.927
    इंग्लंड 2 1 1 2 +0.553
    बांगलादेश 2 1 1 0 -0.653
    श्रीलंका 2 0 2 0 -1.161
    नेदरलँड 2 0 2 0 -1.800
    ऑस्ट्रेलिया 2 0 2 0 -1.846
    अफगाणिस्तान 2 0 2 0 -1.907

    सामना कुठे व कसा पाहता येणार?

    विश्वचषकातील सर्व सामने हे टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. न्यूझीलंड विरुद्ध बांग्लादेश हा सामना मोबाईलवर फुकटात पाहता येईल. मात्र त्यासाठी क्रिकेट चाहत्यांना डिज्नी प्लस हॉटस्टार हा एप डाऊनलोड करावा लागेल. या एपवर विविध भाषेमध्ये क्रिकेट सामन्यांचा आनंद घेता येणार आहे.