न्यूझीलंडचा भारतावर ७ विकेट्सने विजय

केन विलियम्सनने टॉम लॅथमच्या साथीने चौथ्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी रचली. विलियम्समन आणि लॅथम दोघांनीही अर्धशतक ठोकत न्यूझीलंडला मजबूत स्थितीत पोहचवले. लॅथमने आपली आक्रमक फलंदाजी कायम ठेवत १०४ चेंडूत १४५ धावा ठोकल्या. तर केन विलियम्सनने नाबाद ९४ धावा करत न्यूझीलंडचा विजय ४७. १ षटकातच पार केला.

    भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघावर ७ विकेट्सने विजय मिळवला.

    टॉम लॅथम (नाबाद १४५) आणि केन विलियम्सन (९४) यांनी चौथ्या विकेटसाठी तब्बल २२१ धावांची भागीदारी रचत भारताने दिलेले ३०६ धावांचे आव्हान पार केले. त्यामुळे पहिला सामना जिंकल्याने एकदिवसीय मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडचा हा सलग १३ वा वनडे विजय होता.

    एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारताने दमदार फलंदाजी करत ३०० पार धावसंख्या नेली आहे. भारताने सामन्याची सुरुवातच दमदार पद्धतीनं केली. सलामीवीर शुभमन गिलसह कर्णधार शिखर धवन यांनी स्फोटक खेळी सुरु केली. दोघेही चांगल्या लयीत होते. दोघांनी शतकी भागिदारी पूर्ण करताच ५० धावांवर शुभमन गिल बाद झाला. श्रेयस अय्यरच्या ८० धावांच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर ३०७ धावांचे आव्हान ठेवले आहे.

    न्यूझीलंडने भारताचे ३०७ धावांचे आव्हान पार करताना सावध सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र शार्दुल ठाकूरने फिन अॅलना २२ धावांवर बाद केले. त्यानंतर केन विलियम्सन आणि डेवॉन कॉनवायने भागीदारी रचत किवींना अर्धशतकी मजल मारून दिली. मात्र भारताची स्पीडगन उमरान मलिकने कॉनवॉयला २४ धावांवर बाद करत भारताला दुसरे यश मिळून दिले. उमरान मलिकने आपल्या पहिल्याच स्पेलमधील पाचव्या षटकात त्यात तीव्रतेने आणि वेगाने मारा करत न्यूझीलंडचा दुसरा फलंदाज टिपला. त्याने अनुभवी डॅरेल मिचलला ११ धावांवर बाद करत भारताची तिसरी आणि स्वतःची दुसरी विकेट मिळवली.

    केन विलियम्सनने टॉम लॅथमच्या साथीने चौथ्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी रचली. विलियम्समन आणि लॅथम दोघांनीही अर्धशतक ठोकत न्यूझीलंडला मजबूत स्थितीत पोहचवले. दरम्यान, शार्दुल ठाकूर टाकत असलेल्या ४० व्या षटकात टॉम लॅथमने तब्बल २५ धावा चोपून आपले शतक पूर्ण केले. यानंतर लॅथमने आपली आक्रमक फलंदाजी कायम ठेवत १०४ चेंडूत १४५ धावा ठोकल्या. तर केन विलियम्सनने नाबाद ९४ धावा करत न्यूझीलंडचा विजय ४७. १ षटकातच पार केला.