न्यूझीलंडने बदललं फायनलचं चित्र, टीम इंडिया बॅकफूटवर

टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, पण नील वॅगनरला (Neil Wagner) पूल करण्याच्या नादात त्याने कॅच दिला, तेव्हा भारताचा स्कोअर 182/6 एवढा झाला. म्हणजेच टीमने 84 बॉलमध्ये 36 रन करून महत्त्वाचे तीन मोहरे गमावले. तिसऱ्या दिवसाचं पहिलं सत्र संपायच्या आधी भारताला अश्विनच्या (R Ashwin) रुपात आणखी एक धक्का बसला.

    साऊथम्पटन: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडच्या (New Zealand) टीमने शानदार पुनरागमन केलं आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवशी रविवारी न्यूझीलंडने 84 बॉलमध्ये 36 रन देऊन भारताच्या 3 विकेट घेतल्या. फास्ट बॉलर काईल जेमिसनच्या (Kyle Jamieson) नेतृत्वात न्यूझीलंडने भारताला बॅकफूटवर नेलं.