टी-२० विश्वचषकासाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर

    मुंबई : ऑक्टोबर महिन्यात सुरु होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२२ साठी न्यूझीलंडने (New Zealand)आपला संघ जाहीर केला आहे. न्यूझीलंडने १५ खेळाडूंचा संघ जाहीर केला असून २०२१ च्या विश्वचषकाच्या तुलनेत संघात तीन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. आयसीसी टी २० विश्वचषक (World Cup 2022) स्पर्धेत केन विल्यमसन तिसऱ्यांदा न्यूझीलंडचा कर्णधार असणार आहे.

    टी २० विश्वचषक संघात न्यूझीलंडचा केंद्रीय करार नाकारणारे ट्रेंट बोल्ट आणि जिमी नीशम हे देखील या संघाचा भाग असणार आहे. फिन ऍलन हा केंद्रीय करार प्राप्त करणाऱ्या सर्वात नवीन खेळाडूंपैकी एक आहे. न्यूझीलंडच्या गोलंदासाठी बोल्ड, लॉकी फर्ग्युसन, टिम साउथी आणि अॅडम मिल्ने सारखे गोलंदाज असणार आहे. इश सोधी फिरकी आक्रमणाचे नेतृत्व करणार असून मायकेल ब्रेसवेल आणि मिचेल सँटनर त्याला साथ देतील. ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मिचेल सँटनर, मायकेल ब्रेसवेल आणि जिमी नीशम या अष्टपैलू खेळाडूंची संघात महत्वाची भूमिका असणार आहे.

    न्यूझीलंडचा विश्वचषक संघ : 

    केन विल्यमसन (कर्णधार), टिम साऊदी, इश सोधी, मिचेल सँटनर, ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, मार्टिन गप्टिल, लॉकी फर्ग्यूसन, डेव्हॉन कॉनवे, मार्क चॅपमन, मायकेल ब्रेसवेल, ट्रेंट बोल्ट, फिन ऍलन