न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय, उमरानच्या जागी चहलला संधी

भारतीय संघाने गेल्या 11 वर्षांपासून घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध एकही मालिका गमावलेली नाही. या सामन्यातील पराभवामुळे भारताचे T-20 मधील नंबर-1 रँकिंगही धोक्यात येणार आहे. म्हणजेच भारताला थोडीशीही चुकी महागात पडू शकेल.

    लखनऊ – भारत-न्यूझीलंड टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज संध्याकाळी 7.00 वाजता लखनऊ येथील भारतरत्न अटल बिहारी इकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. 3 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 0-1 ने पिछाडीवर आहे. त्याच्यासमोर मालिका गमावण्याचा धोका आहे.

    भारताला थोडीशीही चुकी महागात पडू शकेल
    भारतीय संघाने गेल्या 11 वर्षांपासून घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध एकही मालिका गमावलेली नाही. या सामन्यातील पराभवामुळे भारताचे T-20 मधील नंबर-1 रँकिंगही धोक्यात येणार आहे. म्हणजेच भारताला थोडीशीही चुकी महागात पडू शकेल. या सामन्यातील खेळपट्टीचा अहवाल, हवामानाचा अहवाल आणि संभाव्य प्लेइंग-11 या स्टोरीत पुढे पाहायला मिळेल.

    हवामान स्थिती आणि खेळपट्टीचा अहवाल
    लखनऊचे हवामान स्वच्छ असू शकते आणि तापमान 11 ते 22 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते. येथे नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला प्रथम फलंदाजी करायला आवडेल, कारण 5 पैकी 3 सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. मैदानावर उच्च स्कोअरिंग सामना अपेक्षित आहे. गेल्या दोन T-20 मध्ये भारताने 190+ धावा करून विजय मिळवला.