न्यूझीलंडने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

या सामन्यात भारताने अश्विन आणि जडेजा हे दोन स्पिनर उतवले आहेत, तर फास्ट बॉलिंगची जबाबदारी इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या तिघांवर असेल. टेस्ट क्रिकेटला आणखी रोमांचक करण्यासाठी आयसीसीने 2019 साली या स्पर्धेला सुरुवात केली.

    साऊथम्पटन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) याने टॉस जिंकला आहे. केन विलियमसनने पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यामध्ये आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होत आहे.

    या सामन्यात भारताने अश्विन आणि जडेजा हे दोन स्पिनर उतवले आहेत, तर फास्ट बॉलिंगची जबाबदारी इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या तिघांवर असेल. टेस्ट क्रिकेटला आणखी रोमांचक करण्यासाठी आयसीसीने 2019 साली या स्पर्धेला सुरुवात केली.

    मॅचचा पहिला दिवस पावसामुळे रद्द झाल्यानंतर आता साऊथम्पटनमध्ये उन्ह आलं आहे, ज्यामुळे क्रिकेट रसिक सुखावले आहेत. पहिला दिवस पावसामुळे फुकट गेला असला तरी आयसीसीने या सामन्यासाठी सहावा दिवस राखीव ठेवला आहे. पुढचे चार दिवस दिवसाला 8 ओव्हर म्हणजेच अर्धा तास जास्त खेळ होईल.