गेल्या ८ महिन्यांत ६ कर्णधारांसोबत काम करण्याची योजना नव्हती : राहुल द्रविड

द्रविडने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारला आणि गेल्या वर्षी जुलैमध्ये श्रीलंका दौऱ्यात शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्यासोबत काम केले. भारताच्या आयर्लंडच्या दोन सामन्यांच्या छोट्या दौऱ्यासाठी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्यात आले आहे.

    बंगळुरू: भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid ) यांनी मान्य केले आहे की, वेगवेगळ्या प्रसंगी राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या सहा कर्णधारांसोबत काम करणे ही अशी गोष्ट होती, ज्याची त्यांनी योजना आखली नव्हती ( didnt plan work six captains ). पण त्याचवेळी द्रविड यांनी त्यांची सकारात्मक बाजू सांगितली की, भारताच्या कर्णधारात वारंवार होणाऱ्या बदलांमुळे त्यांना संघात नेतृत्व करण्याची संधी मिळाली.

    द्रविडने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारला आणि गेल्या वर्षी जुलैमध्ये श्रीलंका दौऱ्यात शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्यासोबत काम केले. भारताच्या आयर्लंडच्या दोन सामन्यांच्या छोट्या दौऱ्यासाठी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्यात आले आहे.

    ते म्हणाले, हे रोमांचक आणि आव्हानात्मकही होते. गेल्या आठ महिन्यांत मला जवळपास सहा कर्णधारांसह काम करावे लागले आहे, जेव्हा मी पहिल्यांदा सुरुवात केली, तेव्हा ते खरोखर नियोजित नव्हते, परंतु कोरोना व्हायरसमुळे असे करणे भाग पडले, ज्यामुळे संघांच्या कामाच्या ओझ्यामुळे व्यवस्थापन आणि कर्णधारपदातही काही बदल झाले आहेत.

    मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल बोलताना द्रविड यांनी, या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2-1 अशा फरकाने कसोटी मालिकेतील पराभवाकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, “आम्ही सतत शिकत आहोत, सुधारत आहोत आणि गेल्या आठ महिन्यांत आम्हाला चांगले होण्याच्या संधी मिळाल्या आहेत.” आम्ही बर्‍याच वेगवेगळ्या लोकांसोबत काम करण्याचा प्रयत्न केला आहे, जे खूप चांगले राहिले आहे.

    ते पुढे म्हणाले, “गेल्या आठ महिन्यांत जेव्हा मी मागे वळून पाहतो, तेव्हा कसोटी मालिकेच्या दृष्टीने दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणे थोडे निराशाजनक होता. द्रविडने तरुण प्रतिभांचा उदय आणि आयपीएल 2022 मधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला, जे त्यांना भविष्यात भारतीय संघाला मदत करेल असे वाटते.