
भारतीय संघाला आता चौथा सामना आज १९ ऑक्टोबर रोजी बांग्लादेशविरुद्ध पुण्याच्या मैदानावर खेळायचा आहे.
वर्ल्ड कप २०२३ : भारताने आयोजित केलेला एकदिवसीय विश्वचषक २०२३ आता दोन मोठ्या अपसेटसह अतिशय रोमांचक होत आहे. श्रीलंका वगळता सर्व ९ संघांनी आपले विजयाचे खाते उघडले आहे. यामध्ये अफगाणिस्तानने इंग्लंडचा तर नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. पण या विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आणि न्यूझीलंडचा प्रवास खूपच छान झाला आहे. किवी संघाने पहिले चार सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर भारतीय संघाने पहिले तीन सामने जिंकले असून ते दुसऱ्या स्थानावर आहे.
भारतीय संघाला आता चौथा सामना आज १९ ऑक्टोबर रोजी बांग्लादेशविरुद्ध पुण्याच्या मैदानावर खेळायचा आहे. जर भारतीय संघाने हा सामना जिंकला तर तो न्यूझीलंडला मागे टाकून पुन्हा अव्वल स्थानावर विराजमान होईल आणि किवी संघासह उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या अगदी जवळ येईल. बांग्लादेशला पराभूत केल्यानंतर, भारतीय संघाने पुढील २ सामने जिंकले, तर ६ विजयांसह १२ गुणांसह उपांत्य फेरीसाठी मजबूत दावा करेल. मात्र उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित करण्यासाठी भारतीय संघाला पुढील आणखी ३ सामने जिंकावे लागणार आहेत. मग रोहित आणि ब्रिगेडला उपांत्य फेरीत जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.
बांग्लादेशचा पराभव करून पुढील ३ सामने जिंकल्यानंतर भारतीय संघाचे ७ सामन्यात एकूण १४ गुण होतील. सध्या भारतीय संघ ३ सामने जिंकून ६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी त्याला उर्वरित ६ पैकी किमान ३ ते ४ सामने जिंकावे लागतील. भारतीय संघाला पुण्यात बांगलादेशला चौथा सामना खेळायचा आहे. त्यानंतर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, संघाला धर्मशाला येथे न्यूझीलंड, लखनऊमध्ये इंग्लंड, मुंबईत श्रीलंका, कोलकाता येथे दक्षिण आफ्रिका आणि बेंगळुरूमध्ये नेदरलँड्सविरुद्ध उर्वरित सामने खेळायचे आहेत. यामध्ये भारतीय संघाला न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्याशी स्पर्धा होऊ शकते. बांगलादेश आणि नेदरलँड हे उलथापालथ घडवण्यात तज्ञ आहेत. अशा स्थितीत त्यांच्याबाबतही भारतीय संघाला सावध राहावे लागणार आहे.
भारतीय संघाचे विश्वचषक वेळापत्रक
८ ऑक्टोबर विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई (भारतीय संघ ६ गडी राखून जिंकला)
११ ऑक्टोबर विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली (भारतीय संघ ८ विकेटने जिंकला)
१४ ऑक्टोबर विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद (भारतीय संघ ७ विकेट्सने सामना जिंकला)
१९ ऑक्टोबर विरुद्ध बांगलादेश, पुणे
२२ ऑक्टोबर विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला
२९ ऑक्टोबर विरुद्ध इंग्लंड, लखनौ
२ नोव्हेंबर विरुद्ध श्रीलंका, मुंबई
५ नोव्हेंबर विरुद्ध दक्षिण आफ्रिका,
१२ नोव्हेंबर विरुद्ध नेदरलँड, बेंगळुरू