महाराष्ट्राच्या ओजसचा बाण सुवर्ण पदकावर, तिरंदाजीमध्ये रचला भारताने इतिहास

ओजस देवतळेने भारताला तिरंदाजीमध्ये पुरुष एकल, कपाऊंड आर्चरी आणि मिश्र तिरंदाजीत सुवर्णपदक पटकावलं आहे. आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये भारताला मिळालेलं हे २६ वं सुवर्णपदक आहे.

    आशियाई क्रीडा स्पर्धा : आज आशियाई क्रीडा स्पर्धेचा चौदावा दिवस आहे आणि भारतीय खेळाडूंनी पदकांची लूट अजूनही कायम आहे. नागपूरच्या मराठमोळ्या ओजस देवतळे (Ojas Deotale) ने भारताला तिरंदाजीमध्ये तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. तर भारताच्या अभिषेक वर्माने रौप्यपदकाची कमाई केली आहे. महत्वाचं म्हणजे आशियाई स्पर्धा 2023 मध्ये ओजस देवतळेचं हे तिसरं सुवर्णपदक आहे. ओजस देवतळेने भारताला तिरंदाजीमध्ये पुरुष एकल, कपाऊंड आर्चरी आणि मिश्र तिरंदाजीत सुवर्णपदक पटकावलं आहे. आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये भारताला मिळालेलं हे २६ वं सुवर्णपदक आहे.

    भारताच्या खात्यात आतापर्यंत १०१ पदकं जमा झाली आहेत. यामध्ये २६ सुवर्णपदक, ३५ रौप्य पदकं आणि ४० कांस्यपदकांचा समावेश आहे. तिरंदाजीमध्ये ओजस देवतळे, अभिषेक वर्मा आणि प्रथमेश जावकर यांनी भारताला काल सुवर्णपदक मिळवून दिलं. तिरंदाज ओजस देवतळे, अभिषेक वर्मा आणि प्रथमेश जावकर यांनी दक्षिण कोरियाचा पराभव करत भारताला गोल्ड मिळवून दिलं. भारताच्या टीमने २३५-२३० असा विजय मिळवला. अंतिम सामन्यात अभिषेक, ओजस आणि प्रथमेश यांनी शानदार प्रदर्शन केले. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा ओजस देवतळे आणि ज्योती सुरेखा वेण्णम यांनी कंपाऊंड आर्चरी मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिलं. ओजस देवतळे आणि ज्योतीच्या जोडीने तिरंदाजी मिश्र स्पर्धेत भारताला १६ वं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.