पॅरिस ऑलिंपिकमध्ये फक्त भारताचा एकच पुरुष कुस्तीपटू खेळणार!

यंदा पात्रता फेरीत त्याच्याकडून आशा होत्या. पण पहिल्याच फेरीत त्याला पराभूत व्हावे लागले.

    अमन सेहरावत : पॅरिस ऑलिंपिक जागतिक पात्रता फेरी (Paris Olympic World Qualifiers) आयोजन करण्यात आली होती. यामध्ये भारताच्या कुस्तीपटूंच्या हातात निराशाच मिळाली. अमन सेहरावत (Aman Sehrawat) याने शनिवारी मध्यरात्री दमदार कामगिरी केली. त्याने जागतिक पात्रता फेरीतील पुरुषांच्या फ्रीस्टाईल 57 किलो वजनी गटात भारतासाठी पॅरिस ऑलिंपिक कोटा मिळवला. अनेक भारताचे दिग्गज खेळाडू यामध्ये सहभागी झाले होते परंतु त्यांनी केलेली कामगिरी ही पुरेशी नव्हती. पॅरिस ऑलम्पिक कोटा मिळवणारा अमन हा भारताचा पहिला पुरुष कुस्तीपटू ठरला आहे. दीपक पुनियाचे टोकियो ऑलिंपिकमध्ये थोडक्यासाठी ब्राँझपदक हुकले होते. त्यामुळे यंदा पात्रता फेरीत त्याच्याकडून आशा होत्या. पण पहिल्याच फेरीत त्याला पराभूत व्हावे लागले.

    जागतिक पात्रता फेरीमध्ये बजरंग पुनिया (Bajarang Punia), दीपक दहिया (Deepak Dahiya) अशा अनेक कुस्तीपटूंना पराभवाचा सामना करावा लागला आहे. रवी दहिया (Ravi Dahiya) याने 57 किलो वजनी गटात टोकियो ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक पटकावले होते. आता अमन सेहरावत याने 57 किलो वजनी गटातच पॅरिस ऑलिंपिकचा कोटा मिळवला आहे. त्यामुळे भारतीय कुस्ती संघटनेकडून 57 किलो वजनी गटाची चाचणी घेण्यात आल्यास अमन – रवी यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारतीय महिला कुस्तीपटूंची दमदार कामगिरी
    पॅरिस ऑलिंपिक जागतिक पात्रता फेरीमध्ये भारताच्या सहा महिलांनी ऑलिंपिक कोटा जिंकला आहे. यामध्ये भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिने 50 किलो वजनी गटात ऑलिंपिक कोटा मिळवला आहे. अंतिम पांघल हिने 53 किलो वजनी गटामध्ये जागा मिळवली आहे. अंशू मलिक ही सुद्धा पॅरिस ऑलिंपिकमध्ये जाण्यासाठी सज्ज आहे. 76  किलो वजनी गटात रितिका हिने जागा मिळवली आहे. निशाने सुद्धा 68 किलो वजनी गटामध्ये जागा मिळवली आहे.