३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंची ऐतिहासिक कामगिरी; खऱ्या अर्थाने राज्याची दिवाळी साजरी

प्रचंड मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर राज्यातील खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करत महाराष्ट्राला दोनशेपेक्षा जास्त पदके मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली. या कामगिरीमुळे राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन करताना बोलत होते.

    पणजी : प्रचंड मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर राज्यातील खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करत महाराष्ट्राला दोनशेपेक्षा जास्त पदके मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली. या कामगिरीमुळे राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन करताना बोलत होते.

    तळागाळातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने प्रयत्नशील असतात. परराष्ट्र धोरण राबवत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडा विश्वातही भारत देशाला नवीन ओळख देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने देशांमध्ये विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठबळामुळे गुणवंत खेळाडू सर्वोत्तम खेळी करत भारत देशाच्या नावलौकिकास साजेशी अशी कामगिरी करत आहे.

    पंतप्रधान मोदी यांचा दूरदृष्टीतून लक्षात घेऊन महाराष्ट्रातील मराठमोळे खेळाडू सध्या जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवत आहेत. त्यामुळेच आशियाई क्रीडा स्पर्धा, ऑलिम्पिक स्पर्धा व जागतिक अजिंक्यपदासारख्या स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे खेळाडू सोनेरी या संपादन करत असल्याचे बनसोडे यांनी सांगितले.

    महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा

    महाराष्ट्रातील खेळाडूंच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी आम्ही सातत्याने विविध सकारात्मक अशा योजनांचे आयोजन करणार आहोत. यामुळे राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विक्रमी पदकांचा पल्ला गाठणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंना देशासह जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी मिळणार आहे.