
बांगलादेश बॅडमिंटन फेडरेशनने नुकत्याच आयोजित केलेल्या या ५ दिवसीय स्पर्धेचा समारोप झाला. जगभरातील खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला. भारतीय खेळाडूंनी यात उत्तम कामगिरी नोंदवली.
मुंबई : बांगलादेशच्या ढाका येथील बंगबंधू नॅशनल स्टेडियम मध्ये आयोजित योनेक्स-सनराइज बांगलादेश इंटरनॅशनल चॅलेंज २०२१ मध्ये हॅटसन बॅडमिंटन सेंटरच्या भारतीय बॅडमिंटनपटू रित्विक संजीवीने उपविजेतेपद पटकावले. रविवारी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत अभिषेक सैनीशी २१-१५, २१-१८ अशी कडवी झुंज दिल्यानंतर रित्विक संजीवीला पराभव पत्करावा लागला. दुसर्या महत्त्वपूर्ण घडामोडीत, हॅटसन बॅडमिंटन केंद्रातून प्रशिक्षण घेतलेल्या निला वल्लुवनने नझीर खान बरोबर मिश्र दुहेरी स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली.
बांगलादेश बॅडमिंटन फेडरेशनने नुकत्याच आयोजित केलेल्या या ५ दिवसीय स्पर्धेचा समारोप झाला. जगभरातील खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला. भारतीय खेळाडूंनी यात उत्तम कामगिरी नोंदवली.
या प्रसंगी बोलताना, अजित हरिदास, मुख्य मार्गदर्शक, हॅटसन बॅडमिंटन केंद्र, म्हणाले, “रित्विकचा प्रवास हा प्रशिक्षक आणि त्यांच्या प्रशिक्षण पद्धत यांच्या सततच्या परिश्रमाचा मिलाफ आहे.नवीन उंची गाठण्याची क्षमता असलेल्या अशा खेळाडूबरोबर काम करणे आनंददायी आहे. पुढच्या काळातही आम्ही विविध प्रतिभावंताची ओळख करून देत राहू. त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण मिळवून देण्यासाठी आणि देशाला बहुमान मिळवून देण्यासाठी आम्ही आमचे व्यासपीठ वापरू.