कोरोनाच्या विळख्यावर मात करत क्रीडा विश्वाची प्रगतीकडे वाटचाल, खेळाडूंचा आत्मविश्वास वाढणे गरजेचे

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र (Central Government) आणि राज्य सरकारकडून (State Government) लॉकडाऊन (Lockdown) घोषित (Announced) करण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण भारत ठप्प झाला होता. अर्थव्यवस्थेला (Economic) खिळ बसली होती. असं म्हणायला काहीच हरकत नाही. परंतु कोरोनाचा संसर्ग मार्च महिन्यात झाल्यामुळे सर्वप्रथम भारतात क्रीडा विश्वाला मोठा फटका (More Impact To The Sports In India) बसला.

कोरोना विषाणूने (Corona Virus) संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. २०२० हा वर्ष ऐतिहासिक असून कोरोनाचा प्रसार अद्यापही कमी झालेला नाहीये. तसेच सर्व प्रकारच्या मैदानी खेळाच्या (All Ground Sports) वर्चस्वाला कोरोनाने विळखा घातला असून क्रीडाविश्वाला (Cricket and all Sport) मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र (Central Government) आणि राज्य सरकारकडून (State Government) लॉकडाऊन (Lockdown) घोषित (Announced) करण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण भारत ठप्प झाला होता. अर्थव्यवस्थेला (Economic) खिळ बसली होती. असं म्हणायला काहीच हरकत नाही. परंतु कोरोनाचा संसर्ग मार्च महिन्यात झाल्यामुळे सर्वप्रथम भारतात क्रीडा विश्वाला मोठा फटका (More Impact To The Sports In India) बसला.

कोरोना संसर्गाचा सर्वाधिक परिणाम क्रीडा विश्वावर

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष विकास काकतकर यांनी सांगितलं की, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची धुरा सांभाळून मला काहीच महिने पूर्ण झाले होते. त्यानंतर कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण जगात स्थानिक मैदानांपासून ते क्लबपर्यंत आणि राष्ट्रीय पातळीसोबतच आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत सर्व प्रकारचे क्रिकेट सामने स्थगित करण्यात आले होते. सर्व खेळाडू, प्रशिक्षक, सूत्रसंचालक , कर्णधार, पंच , क्रिकेट सामन्याचे आयोजनकर्ते आदी. आणि सर्व क्रिकेट प्रेमी आपल्या घरी होते. त्याचप्रकारे राज्यामध्ये सर्वाधिक प्रतिष्ठित समजली जाणारी रणजी स्पर्धा सुद्धा रद्द करण्यात आली होती. तसेच अंडर-१९ स्पर्धा रद्द करण्यात आली होती. क्रिकेट हे महत्त्वाचे आणि कारकिर्दीतले क्षेत्र असल्यामुळे खेळाडूचा प्रत्येक मिनिट, दिवस, महिना आणि वर्ष महत्त्वपूर्ण असतो. परंतु कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण क्रीडा विश्व आणि खेळाडूंच्या कारकिर्दीवर पाऊस पडला आहे.

अनलॉकमध्ये क्रीडा क्षेत्रावर कोरोनाचे सावट

लॉकडाऊनच्या काही महिन्यानंतर अनलॉकच्या प्रक्रियेला सुरूवात झाली होती. अनेक लोकांचे जनजीवन लॉकडाऊनमध्ये विस्कळीत झाले असता, त्यांच्यामध्ये काहीशी सुधारणा आणि प्रगती जाणवू लागली होती. परंतु क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रात काडीमात्र बदल झालेला नव्हता. परंतु कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर काही दिवसातंच मनोरंजन, कला आणि क्रीडा क्षेत्र केंद्र आणि राज्य सरकारकडून खुलं करण्यात आलं होतं. परंतु कोरोनाचा प्रकोप प्रचंड प्रमाणात वाढू नये, यासाठी काही निर्बंध कायमस्वरूपी लादण्याच आले होते. या निर्बंधांमुळे क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले. परंतु क्रिकेट प्रेमी म्हणजेच प्रेक्षकांना आपल्या आवडत्या खेळापासून दूर ठेवण्यात आलं. प्रेक्षकांना स्टेडिअममध्ये येण्यास परवानगी दिली नव्हती. त्यामुळे क्रिकेटच्या सामन्यांदरम्यान प्रेक्षकांचा उत्साह, त्यांच्या टाळ्या, शिट्या आणि आनंदित किंवा उत्साहित होऊन आवाज करणे, अशा प्रकारची वास्तविकता जणू काही नष्टचं झाली आहे. परंतु त्यांचा आवाज अजूनपर्यंत कानांवर पडत आहे.

खेळाडूंचा आत्मविश्वास वाढणे गरजेचे

कोरोनाच्या विषाणूचा सर्वाधिक परिणाम खेळाडूंच्या मॉरलवर झाला आहे. कारण कित्येक महिने खेळाडू आपल्या घरात होते. त्यामुळे क्रिकेटचा सराव आणि सामने यांच्यामध्ये अंतर वाढले. यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी झाला होता. जर क्रीडा क्षेत्राला पुन्हा एकदा नवीन ऊर्जा द्यायची झाल्यास, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे खूप गरजेचे आहे. यामध्ये अनेक छोटे खेळाडू आहेत. जसं की, अंडर १४, १६ आणि १९ या खेळाडूंना सुद्धा विशेष प्रशिक्षणासोबत विविध समुपदेशन सूत्रांचे आयोजन करावे लागणार आहे. तसेच येणाऱ्या काळात याच सर्व गोष्टींवर त्यांचा फोकस असणार आहे. ज्याप्रमाणे खेळाडूंनी आपलं आत्मविश्वास गमावलं आहे. त्याचप्रमाणे हे परत आणणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात भवितव्य आणि उज्ज्वल प्रकाशमय होईल.

महाराष्ट्र क्रिकेटला देशात अव्वल स्थानी पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार

कोरोनाचा प्रसार कमी झाल्यानंतर सरकार महाराष्ट्र क्रिकेटला देशात अव्वल स्थानी पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यामध्ये MPL सारख्या स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार आहे. नवनवीन खेळाडूंना शोधण्यासाठी टॅलेंट हंट यांसारखे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. नवीन प्रशिक्षणातून आम्ही चांगल्या खेळाडूंचा शोध घेणार आहोत. महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात क्रिकेटसाठी अधिकपटीने उत्साह आणि आवड आहे. अशातच येथे काही चांगले खेळाडू आहेत. विशेषत: ग्रामीण भागातून वेगवान गोलंदाज राज्य आणि देशाला मिळू शकतील. परंतु या खेळाडूंना चांगल्या प्रकारे प्रशिक्षण आणि संधी मिळण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी अधिकतम कार्य करण्याची गरज भासणार आहे.

२०२१ हे वर्ष क्रीडा क्षेत्रासाठी सर्वाधिक उत्कृष्ट ठरण्याची शक्यता?

२०२० वर्षात क्रीडा क्षेत्राला मोठा फटका बसल्यामुळे बरचं आर्थिक नुकसान झालं. त्यानंतर खेळाडूंचा आत्मविश्वास सुद्धा कमी झाला. परंतु कोरोनाच्या संकटांवर मात करत क्रीडा क्षेत्र फिनिक्सची उड्डाण भरण्यास तयार आहे. अपयश आल्यानंतर प्रगती जाण्यापेक्षा धावण्याचा कठीण आणि आव्हानात्मक मार्ग म्हणजे क्रीडा क्षेत्र. त्यामुळे आगामी वर्ष क्रीडा क्षेत्रासाठी उत्तम राहणार आहे. तसेच या क्षेत्राला नवीन वाट दाखवण्यासाठी संपूर्ण क्रीडा विश्व सज्ज झालं आहे.