pv sindhu

गेल्या वर्षीची जागतिक अजिंक्यपद विजेती पी.व्ही. सिंधू(p v sindhu) हिला पुन्हा एकदा प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या(All England Badminton championship) उपांत्य सामन्यात पराभव पत्करावा लागला. शनिवारी येथे झालेल्या महिला एकल वर्गात थायलंडच्या पोर्नपावी चोचुवेंगसोबत झालेल्या लढतीत तिला पराभव पत्करावा लागला.

    बर्मिंघहॅम. गेल्या वर्षीची जागतिक अजिंक्यपद विजेती पी.व्ही. सिंधू हिला पुन्हा एकदा प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात पराभव पत्करावा लागला. शनिवारी येथे झालेल्या महिला एकल वर्गात थायलंडच्या पोर्नपावी चोचुवेंगसोबत झालेल्या लढतीत तिला पराभव पत्करावा लागला. ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक प्राप्त सिंधू जगातील अकराव्या क्रमांकाची खेळाडू चोचुवोंगचा सामना करण्यास असमर्थ ठरली. तसेच ४३ मिनिटे झालेल्या सामन्यात १७-२१, ९-२१ अशा सेटमध्ये तिचा पराभव झाला. विशेष म्हणजे २०१८ मध्ये झालेल्या स्पर्धेतही सिंधूचा पराभव झाला होता.

    यामुगाचीला केले होते पराभूत

    सिंधूने तिसऱ्या क्रमांकावरील जपानची अकाने यामागुचीला नमवून ऑल इंडिया बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकल गटाच्या उपान्त्य फेरीत प्रवेश केला होता. सिंधूने पहिला सेट गमावल्यानंतर दमदार पुनरागमन करीत १६-२१, २१-१६, २१-१९ ने विजय प्राप्त केला होता. स्विस ओपन अंतिम सामन्यात खेळणाऱ्या सिंधूने आक्रमक खेळ दाखविला परंतु पहिल्याच सेटमध्ये तिला चुकांचा परिणाम स्वीकारावा लागला. यामागुचीने १७-११ अशी आघाडी तर घेतली परंतु सिंधूने पुनरागमन करीत १५-१८ अशा फरकाने बाजी उलटवली. त्यानंतर यामागुचीने पहिला सेट जिंकला खरा परंतु दुसऱ्या सेटमध्ये दोघींनीही चुका केल्या. सिंधूने ६-२ अशी आघाडी घेतली ती नंतर ८-४ अशी झाली. यामागुचीने २ वेळा शटल नेटमध्ये टाकले. ब्रेकनंतर सिंधुने ५ अंक कायम ठेवले व १९-१३ अशी आघाडी घेतली त्यानंतर यामागुचीने एक शॉट गमावला व सिंधूने ५ गुणांसह पुनरागमन केले होते.

    रोमांचक लढत
    निर्णायक सामन्यात ही लढत बरोबरीची होती व स्कोरही २-२ वरून २-७ असा झाला. त्यानंतर सिंधूने १४-१० अशी आघाडी घेतली परंतु यामागुचीने पुनरागमन करीत स्कोअर १३-१५ असा करण्यात यश मिळविले होते. तथापि तिने केलेल्या चुकांमुळे हा स्कोअर १७-१७ असा बरोबरीत झाला. त्यानंतर सिंधूने १९-१८ अशी आघाडी घेताच यामागुचीचा शॉट वाईड गेला व सिंधूने गुणांकासह हा सामना जिंकला होता.