ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर 62 धावांनी शानदार विजय, डोंगराएवढे लक्ष्य गाठताना पाकच्या फलंदाजांना अपयश

    चिन्नास्वामी स्टेडियम/बंगळुरू : आज दिवस होता डेव्हीड वॉर्नरचा त्याने 163 धावांची मोठी खेळी करीत संघाच्या धावसंख्येत मोलाची भर टाकली त्याला मिचेल मार्शनेसुद्धा चांगली साथ दिली. आज ऑस्ट्रेलियाचा दिवस होता. आज ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी पाकिस्तानसमोर 367 धावांचा डोंगर उभा केला.

    ऑस्ट्रेलियाने आज प्रथम फलंदाजी करताना पाकच्या गोलंदाजांचा अक्षरश: धुव्वा उडवला. सलामीला आलेल्या डेव्हीड वॉर्नर आणि मायकेल मार्शने पाकच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत २५९ धावांची मोठी भागीदारी केली. आज डेव्हीड वॉर्नर आणि मायकेल मार्शने एका चांगल्या इराद्याने मैदानात उतरली होती. त्यांनी पाकिस्तानी गोलंदाजांना धू धू धुऊन काढले. विश्वचषकातील २५९ धावांची मोठी भागीदारी त्यांनी केली. परंतु, ही पहिली जोडी तंबूत परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा सर्व संघच पूर्णपणे अपयशी ठरला. बाकीचे फलंदाजांनी पिचवर येण्याची केवळ औपचारिकता बजावली.

     

    आज ऑस्ट्रेलियाचे खेळाडूच्या सलामी जोडीने धमाकेदार खेळी करीत मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. आज पाकिस्तानच्या गोलंदाजांची अस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी शाळाच घेतली. सलामी ला आलेल्या जोडीने केलेल्या धावांच्या मोबदल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ मोठी धावसंख्या उभारू शकला. त्या बदल्यात पाकिस्तानच्या फलंदाजांना मोठ्या धावसंख्येचे लक्ष्य गाठता आले नाही.

    ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर 62 धावांनी शानदार विजय, डोंगराएवढे लक्ष्य गाठताना पाकच्या फलंदाजांना अपयश आले. सलामी जोडीने चांगली खेळी करीत 134 धावांची मोठी भागीदारी केली.