Pakistan International shock; After New Zealand, England also canceled the tour of Pakistan

न्यूझीलंड क्रिकेट संघाने (Pakistan Vs New Zealand ) पाकिस्तानचा दौरा रद्द केला होता. यानंतर पाकिस्तानला आणखी एक झटका बसला आहे. आणखी एका बड्या संघाने पाकिस्तानचा दौरा रद्द केला आहे. न्यूझीलंड पाठोपाठ इंग्लंडनेही पाकिस्तानचा दौरा केला रद्द, सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने यावर शिक्कामोर्तब केला आहे.

    नवी दिल्ली: न्यूझीलंड क्रिकेट संघाने (Pakistan Vs New Zealand ) पाकिस्तानचा दौरा रद्द केला होता. यानंतर पाकिस्तानला आणखी एक झटका बसला आहे. आणखी एका बड्या संघाने पाकिस्तानचा दौरा रद्द केला आहे. न्यूझीलंड पाठोपाठ इंग्लंडनेही पाकिस्तानचा दौरा केला रद्द, सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने यावर शिक्कामोर्तब केला आहे.

    न्यूझीलंडच्या पुरुष संघाने गेल्या आठवड्यात रावळपिंडी येथे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका सुरू होण्याच्या काही मिनिटांपूर्वी अचानक माघार घेत पाकिस्तानला जबरदस्त धक्का दिला होता. त्यानंतर इंग्लंडनेही पुढील महिन्यात होणाऱ्या पाकिस्तानच्या ऐतिहासिक पुरुष आणि महिला दौऱ्यातून माघार घेतली आहे.

    पाकिस्तानमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर टी-२० वर्ल्डकप (T20 World Cup) होणार आहे. इंग्लंडचा क्रिकेट संघ (Pakistan Vs England )ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तानच्या दौऱ्यावर येणार होता. ईसीबीने ट्विट करत या निर्णयाची घोषणा केली आहे.