Pakistan vs Bangladesh
Pakistan vs Bangladesh

  पुणे : विश्वचषकातील ३१ सामना आज कोलकाताच्या इडन गार्डनवर खेळवला जात आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात हा सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने २०४ धावा केल्या. आज बांगलादेशची सुरुवात निराशाजनकच झाली. सलामीला आलेल्या तान्झीद हसन हा ० शून्यावरच बाद झाला.

  लिटन दास आणि मोहमुदल्लाहची भागीदारी

  त्यानंतर लिटन दास आणि शांतो यांनी संघाची कमान सांभाळली परंतु शांतो हा अवघ्या ४ धावांवर बाद झाला. त्यानंतर विकेट किपर मुश्तफीर रहीम हा अवघ्या ५ धावांवर बाद झाला. त्यानंतर लिटन दास आणि मोहमुदल्लाह यांनी संघाची कमान सांभाळत डावाला आकार दिला. लिटन दासने ६४ चेंडूत ४५ धावा केल्या, त्यानंतर महमुदल्लाहने ७० चेंडूत ५६ धावा केल्या.

  कर्णधार शाकीबने धावसंख्या वाढवली

  लिटन दास बाद झाल्यानंतर कर्णधार शाकीब यानेसुद्धा बांगलादेशच्या धावसंख्येत चांगली भर टाकली. त्यानंतर तोहीद ऱ्हीदोय हा खेळण्यास आला. त्याने ७ धावा करून तंबूचा रस्ता धरला. मेहंदी हसन मिराझ हा २५ धावा करून तंबूचा रस्ता धरला. तास्कीन अहमद, मुश्तफीर हे दोघेही अनुक्रमे ६, ३ धावा करून तंबूत परतले.

  पाकिस्तानची फलंदाजी
  आज २०४ धावांचे माफक लक्ष्य घेऊन उतरलेल्या पाकिस्तानने दमदार सुरुवात करीत संघाला विजयाच्या दारात नेऊन ठेवले. सलामी जोडीने १२८ धावांची मोठी भागीदारी करीत पाकिस्तानच्या संघाला आकार दिला. त्यानंतर आलेल्या कर्णधार बाबर आझमला आज लेंथच सापडली नाही. बाबर आझम आज ९ धावांवर तंबूत परतला. त्याला मेंहदी हसनने आऊट केले. आता मोहम्मद रिझवान आणि इफ्तिखार अहमद खेळत आहे.