ICC World Cup 2023 Pakistan vs South Africa
ICC World Cup 2023 Pakistan vs South Africa

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 'करो किंवा मरो' सामन्यात, पाकिस्तान क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि 270 धावा केल्या. या सामन्यात पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझम आणि सौद सकील यांनी अर्धशतके झळकावली. अशाप्रकारे पाकिस्तानचा संपूर्ण डाव 46.4 षटकांत 270 धावांवर आटोपला. गोलंदाजीत दक्षिण आफ्रिकेकडून तबरेझ शम्सीने सर्वाधिक ४ बळी घेतले. याशिवाय मार्को जेन्सनने तीन विकेट्स घेतल्या. तर गेराल्ड कोएत्झीने दोन गडी बाद केले.

    ICC World Cup 2023 Pak vs SA : शेवटपर्यंत चाललेल्या रोमांचक सामन्यात पाकिस्तानला अखेरीस पराभवाचा सामना करावा. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 270 धावा केल्या त्यानंतर दक्षिण अफ्रिका फलंदाजीला उतरली. साऊथ अफ्रिकाला हे लक्ष्य गाठताना प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागली. एडेन मार्कराम आणि डेव्हीड मिलरने चांगली खेळी करीत साऊथ अफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

     

    पाकिस्तानने दिलेले 270 धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या दक्षिण अफ्रिकेचा संघ आजची सुरुवात निराशाजनक राहिली. सलामीला कर्णधार तेंबा बवुमा आणि क्विंटन डी कोकने डावाला सुरुवात केली. परंतु, दोघेही लवकरच बाद झाले. कर्णधार बवुमा आणि क्विंटन डी कॉक अनुक्रमे 28 आणि 24 धावांवर बाद झाले.

     

    त्यानंतर आलेला दुसेन 21 धावांवरच तंबूत परतला. त्यानंतर हेनरिच क्लासेन हा वसिम जाफरच्या गोलंदाजीवर बाद झाला. एडन मार्कराम आणि डेव्हीड मिलरने डाव सावरण्याचा प्रयत्न केला परंतु शाहीन अफ्रिदीने त्याला बाद करून साऊथ अफ्रिकेसमोर पुन्हा संकट उभे केले. सध्या दक्षिण अफ्रिकेच्या 34 ओव्हरमध्ये 209 धावा केल्या आहेत.

    पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 271 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तनाची सुरुवात अत्यंत निराशाजनक राहिली. परंतु कर्णधार बाबर आझमने पाकिस्तानच्या धावसंख्येत मोठी भर टाकली. बाबरने संयमी खेळी करीत अर्धशतक ठोकले. त्यानंतर सौद शकील आणि शादाब खानने संयमी खेळी करीत चांगली फलंदाजी केली.