टी २० आशिया कपसाठी पाकिस्तानच्या संघाची घोषणा; पहिला सामना भारताशी

  क्रिकेट चाहत्यांचे डोळे लागून असलेल्या टी २० आशिया कपची सुरुवात २७ ऑगस्ट पासून होणार आहे. त्यात आशिया कपमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान हे पाच देश एकमेंकाविरुद्ध सामना खेळणार असून या आशिया कपसाठी पाकिस्तान संघ जाहीर करण्यात आला आहे. २८ ऑगस्ट रोजी पाकिस्तानचा संघ त्यांचा पहिला सामना त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या भारताविरुद्ध खेळणार असून क्रिकेटच्या मैदानावरील चुरस पाहण क्रिकेट प्रेमींसाठी औसुक्याचे ठरणार आहे.
  आशिया कपसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने १५ खेळाडूंची घोषणा केली आहे. यात मागील काही सामान्यांपासून संघाबाहेर असलेल्या शाहिद आफ्रिदीचे संघात पुनरागमन करण्यात आले आहे. नेदर्लंडविरुद्धच्या आणि आशियी कप या दोन्ही संघांमध्ये पाकिस्तान संघाची धुरा ही बाबर आझमकडे असणार आहे. नेदरलँड विरुद्ध मालिका खेळणाऱ्या पाच खेळाडूंना आशिया कपच्या संघातून वगळण्यात आले आहे. अब्दुल्ला शफिक, इमाम-अल-हक मोहम्मद हरिस, सलमान अली आगा आणि झाहीद महुम्म्द यांच्या जागी असिफ अली हैदर अली, इफ्तार अहमद, उस्मान कादीर यांचा समावेश केला जाईल. पाकिस्तानचा संघ नेदरलँड विरुद्ध १६, १८ आणि २१ ऑगस्ट रोजी सामने खेळणार आहे.

  आशिया कप मध्ये ३ वेळा भारत पाकिस्तान संघ आमनेसामने येणार?
  आशिया कपच्या ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तान यांसह एका क्वालिफाय संघाला ठेवण्यात आले आहे. तर ग्रुप बी मध्ये श्रीलंका, अफगाणिस्तान, बांग्लादेश हे संघ असणार आहेत. या स्पर्धेसह १० सामने दुबईत तर ३ सामने शारजाह येथे खेळवण्यात येणार आहेत. सर्वच संघ राउंड रॉबिन या पद्धतीने एकमेकांसमोर एका सामन्यात भिडणार आहेत. आशिया कप स्पर्धेची रूप रेषा पाहता भारत पाकिस्तान संघ ३ वेळा एकमेकांविरुद्ध खेळण्याची शक्यता आहे. आशिया कपचा अंतिम सामना ११ सप्टेंबर रोजी दुबईत होणार आहे.

  आशिया कपसाठी पाकिस्तान संघ :
  बाबर आझम (कर्णधार), शाबाद खान, अब्दुला शफिक, फखर रिझवान, हारिफ रौफ, इफ्टीखार अहमद, खुशदील शाहा, मोहोम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जुनिअर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शाहनवाज दहानी, उस्मान कादिरी.