पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जाणून घ्या दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

गेल्या २४ वर्षांपासून पाकिस्तानचा संघ दक्षिण आफ्रिकेकडून विश्वचषकाच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये पराभूत झालेला नाही.

    वनडे विश्वचषक २०२३ : सध्या सुरु असलेला वनडे विश्वचषक २०२३ दिवसेंदिवस रंगतदार सुरु आहे. आज वनडे वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होणार आहे. बाबर आझमच्या संघासाठी हा सामना करो किंवा मरोपेक्षा कमी नाही, कारण जर पाकिस्तानचा संघ या सामन्यात हरला तर विश्वचषकातून बाहेर पडेल. अशा स्थितीत उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी पाकिस्तानला दक्षिण आफ्रिकेला कोणत्याही परिस्थितीत हरवावे लागेल. २४ वर्षांपासून वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान दक्षिण आफ्रिकेकडून हरलेला नाही.

    विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाकिस्तान संघाचा विक्रम अतिशय उत्कृष्ट आहे. गेल्या २४ वर्षांपासून पाकिस्तानचा संघ दक्षिण आफ्रिकेकडून विश्वचषकाच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये पराभूत झालेला नाही. १९९९ च्या विश्वचषकात आफ्रिकेने पाकिस्तानचा शेवटचा पराभव केला होता. पाकिस्तानने २०१५ आणि २०१९ च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोमांचक विजय नोंदवले होते. पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज हारिस रौफ या विश्वचषकात निष्प्रभ दिसत आहे. तो सतत खराब कामगिरी करत आहे. अशा स्थितीत त्याच्या जागी मोहम्मद वसीम ज्युनियरला आज संघात संधी मिळू शकते. याशिवाय सलामीवीर इमाम उल हकच्या जागी फखर जमानचेही संघात पुनरागमन होऊ शकते. सौद शकीलच्या जागी आगा सलमानलाही संधी मिळण्याची शक्यता आहे.

    २०२३ च्या विश्वचषकात पाकिस्तानने आतापर्यंत चांगली कामगिरी केली नसली तरी हा संघ कमबॅक करण्यात पटाईत आहे. पाकिस्तान कधी जिंकेल आणि कधी हरेल हे कोणीही सांगू शकत नाही. मात्र, दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या ज्या फॉर्ममध्ये आहे, ते पाहता पाकिस्तान संघ त्यांच्यासमोर काहीच नाही, हेही नाकारता येणार नाही. या विश्वचषकात पाकिस्तानने गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात लज्जास्पद कामगिरी केली आहे.

    पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
    फखर जमान/इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), आगा सलमान/सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज/हसन अली, उसामा मीर, शाहीन. आफ्रिदी आणि मोहम्मद वसीम जूनियर

    दक्षिण आफ्रिकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
    क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सेन, गेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लिजाद शाबर विल्यम्सी