पाकिस्तानी अभिनेत्रीने उडवली भारतीय संघाची खिल्ली; म्हणाली…

    मुंबई : २० सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) यांच्यात टी २० मालिकेचा पहिला सामना पारपडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला ४ विकेट्सने पराभूत करून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यानंतर स्टार अष्टपैलू हार्दीकने सामन्यातील एक फोटो शेअर करत पराभवातून ‘आम्ही शिकू आणि आणखी सुधार करु अशा आशयाचे ट्वीट केले. मात्र या ट्वीटवर प्रतिक्रियादेत एका पाकिस्तानी अभिनेत्रीने भारतीय संघाची खिल्ली उडवली. त्यानंतर मात्र भारतीय चाहत्यांनी तिला ट्रोल करत प्रतिउत्तर दिले.

    भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही टी२० मालिका भारतात सुरु असून पहिल्या सामन्यात भारताने २०९ धावांचे तगडे लक्ष्य ऑस्ट्रेलियासमोर ठेवले, पण कांगारुंनी ४ गडी आणि ४ चेंडू राखून सामना जिंकला. ज्यानंतर सामन्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या हार्दीक पंड्याने (Hardik Pandya) खिलाडूवृत्तीने एक ट्वीट केले. त्याने लिहिले की, ”आम्ही यातून शिकू आणि आणखी सुधारणा करु, आम्हाला सपोर्ट करणाऱ्या चाहत्यांचं खूप खूप धन्यवाद” दरम्यान हार्दीकच्या या ट्वीटवर पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारी (Seher Shinvari) हिने कमेंट करत लिहिले की,”२३ ऑक्टोबरला विश्वचषकाच्या सामन्यात पाकिस्तानकडूनही पराभूत व्हा, म्हणजे आणखी शिकाल”. सेहरच्या या ट्रोल करणाऱ्या कमेंटनंतर भारतीय चाहत्यांनी तिलाच ट्रोल करत अनेक मजेशीर कमेंट केल्या.