rohit sharma and virat kohli

आयसीसीने एकदिवसीय क्रमवारी जाहीर (ICC ODI Ranking) केली आहे. क्रमवारीमध्ये भारताचे माजी आणि आजी कर्णधार तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. विराट कोहलीची (Virat Kohli) एका स्थानाने घसरण होऊन तो तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) चौथ्या क्रमांकावर आहे.

    आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने एकदिवसीय क्रमवारी जाहीर (ICC ODI Ranking) केली आहे. यामध्ये पाकिस्तानच्या (Pakistan) खेळाडूंनी बाजी मारली आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) पहिला क्रमांक पटकावला आहे. इमाम – उल हकने दुसरा क्रमांकावर उडी मारली आहे. गेल्या काही दिवसांपासून बाबार आणि इमाम यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळेच त्यांनी क्रमवारीमध्ये वरचे स्थान मिळवले आहे.

    क्रमवारीमध्ये भारताचे माजी आणि आजी कर्णधार तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. विराट कोहलीची (Virat Kohli) एका स्थानाने घसरण होऊन तो तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. रोहित शर्मा(Rohit Sharma) चौथ्या क्रमांकावर आहे. पहिल्या दहा जणांमध्ये भारत आणि पाकिस्तान संघाचे प्रत्येकी दोन दोन खेळाडू आहेत. पाचव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डिकॉक आहे.

    गोलंदाजीमध्ये पहिल्या दहा खेळाडूंमध्ये भारताचा एकमेव गोलंदाज आहे. जसप्रीत बुमराह पाचव्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर ट्रेंट बोल्ट आहे तर दुसऱ्या क्रमांकावर जोस हेजलवूड आहे. मॅट हेन्री तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी चौथ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्या दहा अष्टपैलू खेळाडूमध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. बांगलादेशचा शाकीब अल हसन पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. त्यानंतर अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी द्वितीय स्थानावर आहे.

    टी – 20 क्रिकेट भारतीय खेळाडूंची कामगिरी समाधानकारक नसल्याचे दिसत आहे. कारण गोलंदाजी, फलंदाजी आणि अष्टपैलू यामध्ये अव्वल दहा खेळाडूमध्ये फक्त एका भारतीय खेळाडूचा समावेस आहे. भारताकडून इशान किशन एकमेव खेळाडू आहे. फलंदाजीत इशान किशन सहाव्या क्रमांकावर आहे. याशिवाय गोलंदाजी आणि अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल दहामध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही.

    कसोटी क्रमवारीमध्ये फलंदाजीत विराट कोहली दहाव्या क्रमांकावर आहे. तर रोहित शर्मा आठव्या क्रमांकावर आहे. फलंदाजीत ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेनच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. लाबुशेन दुसऱ्या क्रमांकावर घसरलाय. इंग्लंडच्या जो रुटने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर स्मिथ तिसऱ्या आणि बाबर आझम चौथ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन पाचव्या क्रमांकावर आहे.