टी-२० वर्ल्ड कपमध्ये ‘इंडिया’ लिहिलेली जर्सी परिधान करून खेळणार पाकचे खेळाडू, व्हायरल फोटोवर एकच गोंधळ

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमांनुसार, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना त्यांच्या जर्सीच्या उजव्या बाजूला यजमान देशाचे नाव लिहावे लागते. व्हायरल झालेल्या फोटोवर ICC MEN चे T20 विश्वचषक UAE 2021 लिहिलेले होते.

    पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाचे खेळाडू टी -20 विश्वचषक 2021 मध्ये इंडिया लिहिलेली जर्सी घालून खेळताना दिसतील. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत पेजने टी -20 विश्वचषक जर्सीमध्ये दिसणाऱ्या बाबर आझमचा फोटो शेअर केला आहे.  जर्सीच्या उजव्या बाजूला ICC MEN चे T20 विश्वचषक इंडिया 2021 लिहिलेले आहे. याआधी सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला होता. त्यामुळे सर्वत्र एकच गोंधळ उडाला होता.

    वास्तविक, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमांनुसार, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना त्यांच्या जर्सीच्या उजव्या बाजूला यजमान देशाचे नाव लिहावे लागते. व्हायरल झालेल्या फोटोवर ICC MEN चे T20 विश्वचषक UAE 2021 लिहिलेले होते. मात्र, आता पीसीबीने अधिकृत जर्सीचे चित्र ट्विट केल्यामुळे प्रकरण पूर्णपणे स्पष्ट झाले आहे.