पाकिस्तानचा खेळाडू मोहम्मद आमीरने शेअर केली ‘ही’ आनंदाची बातमी

  पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज पाकिस्तानचा खेळाडू मोहम्मद आमीरने (Mohammad Amir)  शेअर केली ‘ही’ आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. आमीर बुधवारी तिसऱ्यांदा बाबा बनला असून त्याला कन्यारत्न झाले आहे. त्याच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून आमिरने सोशल मीडियावर ही गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली. तसेच त्याने अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर नवजात बाळाचा फोटो शेअर केला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Mohammed Amir (@official.mamir)

  मोहम्मद आमीरने २०१६ मध्ये नरजीस खातून (Narjis Khatun) हिच्यासोबत प्रेम विवाह केला. मोहम्मद आमीर आणि पत्नीची ही तिसरी मुलगी आहे. मोठ्या मुलीचे नाव मिन्सा आमीर (Minsa Amir) तर दुसऱ्या मुलीचं नाव झोया आमीर (Zoya Amir) आहे. आता त्यांनी त्यांच्या तिसऱ्या मुलीचं नाव ‘आयरा आमीर’ असे ठेवले आहे. आमीरने दिलेल्या आनंदाच्या बातमीनंतर चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.

  आमिरची पत्नी नरजीस खातून पाकिस्तानी वंशाची असून ती सध्या लंडनमध्ये राहते. सध्या आमीरही मुलं आणि पत्नीसह लंडनमध्ये राहतो. त्याने नुकतंच सांगितलं होतं की, ‘त्याला आता कुटुंबासह इंग्लंडमध्ये राहायचं आहे, आणि त्याच्या मुलांचं शिक्षणही तिथेच करायचं आहे.’