पाकिस्तान संघाच्या नव्या जर्सीचा फोटो व्हायरल; ट्रोलर्सनी केल्या भन्नाट कमेंट्स

    मुंबई : ऑक्टोबर महिन्यापासून आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेला (T20 World Cup) सुरुवात होणार आहे. विश्वचषकाची उत्सुकता सर्वांनाच लागली असून त्याकरता अनेक संघ आपली नवी जर्सी लाँच करत आहेत. भारतासह अनेक संघानी आपली जर्सी लाँच केली असून त्या जर्सी क्रिकेट चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत.

    मात्र असे असताना सोशल मीडियावर टी २० विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या (Pakistan) कथित नवीन जर्सीचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. या जर्सीवरील डिजाईनमुळे व्हायरल झालेल्या फोटोंवर ट्रोलर्स भन्नाट कमेंट्स करत असून सध्या पाकिस्तानची ही कथित जर्सी ट्रोल होत आहे.

    पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने तसेच कोणत्याही खेळाडूने अदयाप आपल्या संघाच्या नव्या जर्सीचा फोटो अधिकृतपणे पोस्ट केलेला नाही. अथवा त्याची माहिती देखील समाज माध्यमांवर टाकली नाही. मात्र सोशल मीडियावर बाबर आझमचा नवी जर्सी घातलेला एक फोटो तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोत पाकिस्तानच्या जर्सीची तुलना ट्रोलर्सनी टरबूज या फळाशी केली आहे.