खराब हवामान असूनही खेळवला सामना, अंगावर विज पडून खेळाडूचा मैदानात मृत्यू!

भर सामन्यात एका खेळाडूवर वीज कोसळली, सर्वांनी त्याच्याकडे धाव घेतली, त्याला तात्काळ रुग्णालयात हलवलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता.

    हवामानाता काहीही नेम नसतो. ते कधी बदलणार ते सांगता येत नाही. शेतात काम करताना अचानक हवामानात बदल होऊन विज पडून शेतकऱ्यांना जीव गमवावा लागल्याच्या घटना यापुर्वी एकण्यात आल्या असणार. मात्र, एका फुटबॅाल सामन्यादरम्याना अंगावर विज पडून खेळाडुला त्याचा जीव गमवावा लागल्याची घटना उघडकीस आहे. इंडोनेशियात (Indonesia) एका एका फुटबॉल (Football) सामन्या दरम्यानही दुर्देवी घटना घडली आहे. खेळता खेळता अचानत हवामानात बदल झाला आणि क्षणात विज कोसळून एका खेळाडूचा मृत्यू झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात हलवलं जात होतं, मात्र रुग्णालयात नेत असतानाच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

    नेमका प्रकार काय

    मिळालेल्या माहितीनुसार,  इंडोनेशियातील एफसी बांडुंग आणि एफबीआय शुबांग यांच्यात हा सामना खेळला जाता होता. हा सामना शनिवारी इंडोनेशियातील पश्चिम जावा येथील सिलीवांगी स्टेडियमवर खेळला गेला. दरम्यान, सामना खेळणाऱ्या एका खेळाडूवर वीज पडली आणि यामध्ये खेळाडूचा दुर्दैवी अंत झाला.

    हवामान खराब असतानाही खेळवण्यात आला सामना

    सामन्या दरम्यान घडलेल्या या दुर्दैवी घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सामन्यादरम्यान खेळाडूंनी आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत केल्याचं स्पष्टपणे दिसून येतं. हा सामना खराब हवामानात खेळला जात होता. दरम्यान, मैदानाच्या एका बाजूला उभ्या असलेल्या खेळाडूवर अचानक वीज पडली. व्हिडीओमध्ये विजांच्या कडकडाटादरम्यान भीषण आग बाहेर पडताना दिसतेय. विजेचा धक्का लागलेला खेळाडू लगेच मैदानावर कोसळल्याचंही व्हिडीओमध्ये दिसत आहे.