पुण्याच्या प्रतिक शंकर देशमुखची भारतीय कुस्ती संघात निवड, एशियन चॅम्पियनशिपमध्ये खुल्या गटातून प्रतिकची पहिली स्पर्धा

पुण्याच्या प्रतिक शंकर देशमुखची भारतीय कुस्ती संघात निवड झाली आहे. जुनमध्ये कजाकिस्तान येथे होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये खुल्यागटातून तो भारताचं नेतृत्त्व करणार आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडिअम येथे पार पडलेल्या ट्रायल सामन्यात प्रतिकने हरियाणाच्या विजय कुमार याचा 12-4 ने पराभव केला.

    मुंबई : पुण्याच्या प्रतिक शंकर देशमुखची भारतीय कुस्ती संघात निवड झाली आहे. जुनमध्ये कजाकिस्तान येथे होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये खुल्यागटातून तो भारताचं नेतृत्त्व करणार आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडिअम येथे पार पडलेल्या ट्रायल सामन्यात प्रतिकने हरियाणाच्या विजय कुमार याचा 12-4 ने पराभव केला. विजयकुमारचा पराभव करुन प्रतिकने भारतीय कुस्तीसंघात आपलं स्थान अधिक घट्ट केलंय. त्याची कामगिरी पाहून werstling Federation Of India चे अध्यक्ष बृजभूषण शरण यांनी प्रतिकच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे. प्रतिक हा पुण्याच्या सह्याद्री कुस्ती संकुलात वस्ताद विजय बराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

    याआधी प्रतिकनं अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत, प्रतीक हा पुण्यातील सह्याद्री कुस्ती संकुलात कुस्तीचे धडे घेत आहे. त्याला वस्ताद विजय बराटे, संदीप पठारे, किशोर नखाते, वीरेंदर कुमार, दिलीप पडवळ, निलेश पाटील, परीक्षित पाटील यांचे मार्गदर्शन लाभले असून, त्याच्या यशाबद्दल मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने मावळ तालुका कुस्तीगीर सघाचे अध्यक्ष मारुती आडकर, पै. चंद्रकांत सातकर, कार्याध्यक्ष संभाजी राक्षे, रामनाथ वारिंगे, सचिव बंडू येवले आदींनी त्याचे अभिनंदन केले आहे. तसेच त्याच्या संघातील निवडीमुळं त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, कौतुकाचा वर्षावर होत आहे.