
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल गाठण्याची मोहीम फत्ते केल्यानंतर आता यजमान टीम इंडिया घरच्या मैदानावरील वर्ल्डकप मिशनसाठी सज्ज झाला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला बॉर्डर गावसकर ट्रॉफीत चौथ्यांदा पराभूत केलंय. त्यामुळं टिम इंडियाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असणार.
मुंबई– भारतात या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा (World cup) होणार आहे, त्याची रंगीत तालिम आजपासून सुरु होत आहे. आज भारत आणि कांगारु (India-Australia) यांच्यात मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. अष्टपैलू हार्दिक पंडय़ाची (Hardik Pandya) नेतृत्वशैली आणि भारतीय संघाची विश्वचषकासाठी तयारी, याकडे आजपासून सुरू होतेय, त्यामुळं या मालिकेकडे सर्वाचे लक्ष असेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल गाठण्याची मोहीम फत्ते केल्यानंतर आता यजमान टीम इंडिया घरच्या मैदानावरील वर्ल्डकप मिशनसाठी सज्ज झाला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला बॉर्डर गावसकर ट्रॉफीत चौथ्यांदा पराभूत केलंय. त्यामुळं टिम इंडियाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असणार.
वानखेडे भारतासाठी कसे?
भारतीय संघाने वानखेडेवर आतापर्यंत विजयासाठी मोठी कसरत केल्याची नोंद आहे. यातून संघाच्या नावे या मैदानावर १९ सामन्यांमध्ये १० विजयाची नोंद करता आली. यातून भारतासाठी हे मैदान आतापर्यंत संमिश्र यश देणारेच ठरले. तर ऑस्ट्रेलिया संघासाठी मुंबईतील वानखेडे मैदानावर लकी ठरले आहे. या संघाने २०२० मध्ये याच मैदानावर टीम इंडियावर १० गड्यांनी मात केली होती.
हेड टु हेड आकडेवारी
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 143 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया टीम इंडियावर वरचढ राहिली आहे. ऑस्ट्रेलियाने 143 पैकी 80 सामन्यात टीम इंडियावर विजय मिळवला आहे. तर टीम इंडियाने 53 वेळा ऑस्ट्रेलियावर मात केली आहे. तर 10 सामन्यांचा काही निकाल लागला नाही. त्यामुळं या मैदानावर कांगारुंचा वरचष्मा राहिला आहे.
सामना कुठे व कसा पाहल?
सामन्याचे ठिकण – वानखेडे स्टेडियम, मुंबई
वेळ : दु. १.३० वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, १ हिंदूी (संबंधित एचडी वाहिन्या)
टीम इंडिया
रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट.
टीम ऑस्ट्रेलिया
स्टीवह स्मिथ (कॅप्टन), ग्लेन मॅक्सवेल, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, झाई रिचर्डसन, सेन एबॉट, कॅमरन ग्रीन, एस्टन एगर, एलेक्स कॅरी, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लाबुशेन, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस आणि एडम झम्पा.