पृथ्वी शॉने आपली चूक मान्य केली; आचारसंहितेचा भंग केल्यामुळे 25 टक्क्यांचा दंडाची कारवाई

आयपीएल 2022 या हंगामातील 45 वा सामना लखनौ सुपरजायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात लखनौ सुपरजायंट्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. दिल्लीचा हा 5 वा पराभव आहे. त्याचबरोबर हा सामना जिंकून लखनौ सुपरजाइंट्स 14 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. दरम्यान, या सामन्यात दिल्लीचा फलंदाज पृथ्वी शॉ याला 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे(Prithvi Shaw fined 25 per cent for violating the code of conduct).

    मुंबई : आयपीएल 2022 या हंगामातील 45 वा सामना लखनौ सुपरजायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात लखनौ सुपरजायंट्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. दिल्लीचा हा 5 वा पराभव आहे. त्याचबरोबर हा सामना जिंकून लखनौ सुपरजाइंट्स 14 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. दरम्यान, या सामन्यात दिल्लीचा फलंदाज पृथ्वी शॉ याला 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे(Prithvi Shaw fined 25 per cent for violating the code of conduct).

    लखनौ सुपरजायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यादरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल पृथ्वीवर ही कारवाई करण्यात आली आहे. शॉ याला मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

    आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.2 अंतर्गत लेव्हल-1 साठी त्याला दोषी ठरवण्यात आले आहे. आचारसंहितेच्या स्तर-1 भंगासाठी, सामनाधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम असतो. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज पृथ्वी शॉने आपली चूक मान्य केली आहे.